Odisa Crime news Saam Digital
क्राईम

Odisha Crime: शिक्षक झाले हैवान! ११ वर्षीय विद्यार्थीनीवर शाळेतील टॉयलेटमध्ये अत्याचार; दोघा नराधमांना अटक

Odisha News: घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून पोलिसांनी दोन्ही शिक्षकांंना अटक केली आहे.

Gangappa Pujari

Odisha Crime News:

गुरू शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना ओडीसामधून समोर आली आहे. ओडीसामध्ये एका पाचवीत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेतील दोघा नराधम शिक्षकांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून पोलिसांनी दोन्ही शिक्षकांंना अटक केली आहे. (Crime News In Marathi)

नबरंगपूर जिल्ह्यातील एका सरकारी निवासी शाळेतील दोन शिक्षकांनी पाचवीत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मंगळवारी (७, नोव्हेंबर) ही घटना घडली होती.

घरी आल्यानंतर मुलीची प्रकृती बिघडल्याने हा संपूर्ण प्रकार समोर आला. ज्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मागासवर्गीय मुलांसाठी असलेल्या आश्रम शाळेत ही घटना घडली. दोन्ही नराधम शिक्षकांनी विद्यार्थीनीला शाळेच्या शौचालयात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, या प्रकरणी दोन्ही नराधम शिक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे. नबरंगपूरचे जिल्हाधिकारी कमल लोचन मिश्रा म्हणाले की, दोघांची चौकशी पूर्ण केल्यानंतर कारवाई केली जाईल असे सांगितले आहे. तसेच जिल्हा कल्याण अधिकार्‍यांना घटनेच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत आणि आम्हाला चौकशी अहवाल मिळाल्यानंतर आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Romantic Zodiac Sign Boys: या 4 राशींची मुलं असतात रोमॅटिंक, मुली स्वत:हून त्यांच्यावर होतात इम्प्रेस

Nagpur : 'मी तुमच्यावर खूप प्रेम करते…'; विवाहित महिलेने आयुष्य संपवलं, नागपुरात खळबळ

राज्यात चाललंय काय? नगसेवकाकडून तिघांवर कोयत्याने वार, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Ladki Bahin Yojana: एप्रिल महिना सुरु; तरी मार्चचा हप्ता मिळाला नाही; लाडक्या बहि‍णींना ₹१५०० कधी मिळणार?

Maharashtra News Live Update: अजितदादाचं निवडणूक लढवत आहे, असं समजा... सुनेत्राकाकीसाठी रोहित पवारांची भावनिक पोस्ट

SCROLL FOR NEXT