Odisha Crime Saam Tv
क्राईम

Crime: शाळकरी मुलीवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार, शौचासाठी घराबाहेर पडली असता अपहरण; नंतर...

Odisha Crime: ओडिशामध्ये नववीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ५ जणांनी सामूहिक बलात्कार केला. मुलगी शौचासाठी घराबाहेर पडली असता आरोपींनी तिचे अपहरण केले आणि तिच्यासोबत भयंकर कृत्य केले.

Priya More

ओडिशामध्ये शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ओडिशाच्या संबलपूरमध्ये घडली. रविवारी संध्याकाळी शौचासाठी घराबाहेर पडलेल्या या मुलीचे अपरहण करून ५ जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या घटनेमुळे ओडिशामध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपींविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे तर दोघे जण फरार आहेत. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

पीडित मुलीने पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पीडिता शौचाला जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. त्यानंतर पाच तरुणांनी तिला थांबवले. त्यानंतर तिला एका अज्ञात स्थळी नेऊन आरोपींनी तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. आरोपी या मुलीला तिथेच सोडून निघून गेले. त्यानंतर पीडित मुलीने घरी धाव घेत तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. पीडितेच्या कुटुंबाने रविवारी रात्री उशिरा जुजुमोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आणि सोमवारी सकाळपर्यंत तीन आरोपींना अटक केली. उर्वरित दोन आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. अटक असणाऱ्या आरोपींनी आपला गुन्हा कबुल केला. या प्रकरणातील सर्व आरोपीच आसपासच्या परिसरातील आहेत. पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिचा जबाब नोंदवून घेण्यात आला. पीडित मुलगी १४ वर्षांची असून ती नववीमध्ये शिकत आहे.

दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी जलदगतीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.फरार आरोपींना पकडण्यासाठीही ते सतत प्रयत्न करत आहेत. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. लोक पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे आणि प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन पोलिसांनी नागरिकांना दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO: हळद लावली, पाया पडला आणि...! कुलदीच्या हळदी समारंभात चहलची मस्ती, पाहा व्हिडीओ

FASTag Pass: फास्टॅग पासच्या किंमती वाढल्या; १ एप्रिलपासून लागू; किती पैसे मोजावे लागणार?

Maharashtra Live News Update : नागपूरमध्ये मेट्रोचा गर्डर तुटून अपघात

Aishwarya Narkar : "कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून..."; ट्रोल करणाऱ्यांना प्रसिद्ध अभिनेत्रीने सुनावले खडेबोल, थेट स्क्रीनशॉट केले शेअर

भरधाव कारने तरुणीला फुटपाथवर चिरडले, २०० मीटर फरफटत नेलं; बाईक, रिक्षा अन् कारला धडक; थरार सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT