क्राईम

Mumbai Crime: अंधेरी परिसरात नायजेरियन पेडलरला अटक; १.२५ कोटी रुपयांचं अमली पदार्थ जप्त

Mumbai Crime: २०२३-२४ मध्ये अमली पदार्थ विरोधी शाखेने ५६ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे. या वर्षात २३३ ड्रग पेडलरांना केली अटक करण्यात आलीय. आज अमली पदार्थ विरोधी शाखेने अंधेरी येथून एका एका ड्रग पेडलरला अटक केलीय. आरोपीची चौकशी केल्यानंतर आरोपी मुंबई शहर आणि उपनगरात अमली पदार्थांची विक्री करत असल्याच तपासात उघड समोर आले.

Bharat Jadhav

Anti Narcotics Branch Bandra Unit Action:

अंधेरी परिसरात अमली पदार्थ विरोधी शाखेने मोठी कारवाई करत एका ड्रग पेडलरला अटक केलीय. या पेडलरकडून अमली पदार्थ विरोधी शाखेने १२५ ग्रॅम जप्त केलंय. या अमली पदार्थाची किंमत १.२५ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. अमली पदार्थ विरोधी शाखेच्या वांद्रे युनिटने ही कारवाई केलीय. (Latest News)

ड्रग पेडलर विरोधातील विशेष कारवाईदरम्यान सोमवारी एक नायजेरियन इसम अंधेरी पूर्व परीसरात संशयपणे वावरताना अमली पदार्थ विरोधी शाखेच्या अधिकाऱ्यांना आढळला. संशयावरून त्याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्या अंग झडती घेतली असता त्यांच्याकडून तब्बल १२५ ग्रॅम कोकेन सापडले. ही एवढा कोकेनचा साठा त्याने कुठून आणला आणि कोणाला तो ते सप्लाय करणार होता याचा सध्या शोध सुरू आहे. आरोपीला आज कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अमली पदार्थ विरोधी शाखेने आरोपीची चौकशी केल्यानंतर आरोपी मुंबई शहर आणि उपनगरात अमली पदार्थांची विक्री करत असल्याच तपासात उघड समोर आले. दरम्यान २०२३-२४ मध्ये अमली पदार्थ विरोधी शाखेने ५६ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहे. या वर्षात २३३ ड्रग पेडलरांना केली अटक करण्यात आलीय. या आरोपींमध्ये १६ नायजेरियन तर २ टांझानियन नागरिकांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad Live : अकलूज मध्ये फेर मतदान घेण्याची मागणी

Maharashtra Politics: मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरेंनी टाकला डाव, एकनाथ शिंदेंना धक्का; बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल

Maharashtra Politics : हायकोर्टाचा निर्णय, मतमोजणी लांबणीवर; मुख्यमंत्र्यांकडूनही आयोगावर हल्लाबोल

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ७० वर्षीय महिलेचा मृत्यू

Skin Care: १० रुपयांच्या व्हॅसलीनने होतात हे फायदे; महागड्या केमिकल क्रिमची कधीच लागणार नाही गरज

SCROLL FOR NEXT