सीबीआयने गुवाहटीत एनएचआयडीसीएलच्या अधिकाऱ्याला लाच घेताना पकडलं
छाप्यात कोट्यवधींची रोकड, फ्लॅट आणि भूखंड जप्त करण्यात आले आहे
अटकेनंतर दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत
गुवाहटीमधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. सीबीआयच्या पथकाने राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेडच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही घटना सोमवारी घडली आहे. हा अधिकारी महामंडळाचा कार्यकारी संचालक आणि प्रादेशिक अधिकारी म्हणून काम पाहत होता. या अधिकाऱ्याचे नाव रितेन कुमार सिंग आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयला आधीच माहिती मिळाली होती की एनएचआयडीसीएलचा हा अधिकारी कंत्राटदारांकडून पैसे उकळणार आहे. तपास यंत्रणेने हुशारीने सापळा रचला आणि १४ ऑक्टोबर २०२५ रोजी ही कारवाई केली. खाजगी व्यक्तीने लाचेची रक्कम देताच सीबीआयचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि दोघांनाही अटक केली. अटक करण्यात आलेला दुसरा व्यक्ती विनोद कुमार जैन आहे, जो कोलकाता येथील एका खाजगी फर्मचा प्रतिनिधी असल्याचे सांगितले जाते.
ही लाच डेमो ते मोरन बायपास या राष्ट्रीय महामार्ग ३७ वर चार पदरी प्रकल्पाशी संबंधित होती. कंपनीला मुदतवाढ आणि पूर्णत्व प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात अधिकाऱ्याने लाच मागितल्याचा आरोप आहे. अटकेनंतर, सीबीआयने आरोपी अधिकाऱ्याच्या गुवाहाटी, गाझियाबाद आणि इंफाळ येथील घर आणि कार्यालयांवर छापे टाकले.
सीबीआयने म्हटले आहे की, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावावर मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि लक्झरी वस्तू सापडल्या आहेत. यामध्ये २.६२ कोटी रुपये रोख, ९ प्रीमियम फ्लॅट, १ ऑफिस स्पेस आणि दिल्ली-एनसीआरमध्ये ३ भूखंड, बेंगळुरूमध्ये १ फ्लॅट आणि १ भूखंड, गुवाहाटीमध्ये ४ अपार्टमेंट आणि २ भूखंड, इम्फाळमध्ये २ भूखंड आणि १ शेती जमीन, ६ लक्झरी वाहनांसाठी कागदपत्रे, लाखो किमतीचे २ महागडे घड्याळे आणि एक चांदीचा बार यांचा समावेश आहे.
अटकेनंतर, दोन्ही आरोपींना गुवाहाटी येथील विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले. जिथे त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सीबीआय आता हे पैसे कुठे गुंतवले गेले आणि त्यात आणखी किती व्यक्तींचा सहभाग आहे याचा तपास करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.