Police investigate the suspicious death of social media influencer Mansi after her family alleged dowry harassment and foul play. 
क्राईम

नवविवाहित सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा संशयास्पद मृत्यू,नवऱ्यासह ६ जणांविरोधात गुन्हा दाखल

Social Media Influencer Found Dead : लखनौच्या सादातगंजमध्ये एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पती सागर राजपूतसह सहा जणांविरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bharat Jadhav

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या मानसीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. ही घटना सादातगंज परिसरात घडली आहे. या नवविवाहित महिलेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर महिलेच्या कुटुंबीयांनी सासरकडच्या लोकांवर हुंड्याचा आरोप केला आहे. हुंड्यापायी मुलीची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला असून मृत मानसीचा पती आणि सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत.

कानपूरच्या टीपी नगर बागाही येथील रहिवासी सुनील कुमार वर्मा यांनी ९ डिसेंबर २०२४ रोजी त्यांची भाची मानसी हिचा विवाह लखनौच्या सादातगंज येथील रहिवासी सागर राजपूत याच्याशी लावला. सागर राजपूत हा एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. इंस्टाग्रामवर त्याचे अंदाजे ७.९३ लाख फॉलोअर्स आहेत. मृत मानसीसुद्धा सोशल मीडियावर सक्रिय होती.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी लग्नात सागरला सुमारे ७ लाख रुपये रोख, आणि इतर घरगुती वस्तू दिल्या आहेत. पण सासरचे लोक त्यावर खूश नव्हते. मानसीच्या आईवडिलांनी आरोप केला की, लग्नात कमी हुंडा दिल्याबद्दल तिला हिणवले जात होतं. तिचा नवरा सागर, सासरे राजेश, दीर अनु, नणंदा बरखा आणि चांदनी, आणि वहिनी आशा यांनी अतिरिक्त हुंडा म्हणून सतत कारची मागणी केली होती.

मानसीच्या घरच्यांनी कार दिली नाही तेव्हा तिला शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागले. मयत महिलेने आपल्या कुटुंबीयांना होणाऱ्या छळाबद्दल वारंवार फोन करून सांगितले होते. तडजोड घडवून आणण्यासाठी कुटुंबीय अनेक वेळा लखनौला आले होते, पण छळ सतत सुरूच राहिले.

खून की आत्महत्या?

शनिवारचच्या दिवशी नातेवाईकांनी कुटुंबाला कळवले की त्यांच्या मुलीने गळफास घेतला आहे. मात्र, तिच्या आईवडिलांचा आरोप केला की, हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्यामुळे तिच्या सासरच्या मंडळींनी आधी तिचा खून केला आणि नंतर ती आत्महत्या वाटावी म्हणून तिचा मृतदेह लटकवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Crime: प्रेमाची थाप मारून पळवून नेलं; नंतर प्रियकर आणि बापाने केले अत्याचार

कामोत्तेजना वाढवणारं बोगस 'कॅप्सुल' औषधचा भांडाफोड; आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ

शासकीय पडीक जमिनींबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना आदेश

पंतप्रधानपदासाठी खासदार फोडले, 2029च्या निवडणुकीसाठी अमित शाहांची तयारी

'ऑपरेशन टायगर' धोक्यात? एकनाथ शिंदेंची खेळी फसणार?

SCROLL FOR NEXT