Navi Mumbai Crime Saam TV
क्राईम

Navi Mumbai Crime : महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या; थरारक घटनेनं तुर्भे हादरलं

Navi Mumbai Crime News : तुर्भे येथील डॉ सामंत विद्यालयात ही घटना घडली आहे. तुर्भे स्टोर येथील ४० ते ५० मुलांनी सदर विद्यार्थ्याला मारहाण केली. या मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

Ruchika Jadhav

विनय म्हात्रे

Turbhe Crime:

नवी मुंबईत एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तुर्भे येथील डॉ.सामंत विद्यालयात ही घटना घडली आहे. तुर्भे स्टोर येथील ४० ते ५० मुलांनी सदर विद्यार्थ्याला मारहाण केली. या मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आदित्य भोसले असे मृत्य विद्यार्थ्याचे मृत्यू नाव आहे. ४० ते ५० जाणांनी आदित्या भोसलेला मारहाण केली तेव्हा त्याचा मित्र देवांग ठाकूर त्याला वाचवण्यासाठी पुढे धावून आला. मात्र समोर एवढ्या मोठ्या संख्येने मुलं होती की त्यांना रोखणे जमले नाही. यात दुसरा विद्यार्थी देवांग ठाकूर गंभीर जखमी झालाय.

सामंत विद्यालयाच्या गेटवरच हा राडा झाला. मुलांच्या टोळक्याने गेटवरच आदित्यला गाठलं आणि डोक्यात, पाठीत, मानेवर, हाता-पायांवर जोरदार मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाण सुरू झाल्यावर त्याला वाचवण्याचा त्याच्या मित्राने फार प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. रागाच्याभरात अन्य विद्यार्थ्यांनी आदित्यचा मृत्यू होईपर्यंत त्याला मारलं.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणांमधील राडा आणि आदित्यच्या हत्येमागे नेमकं कारण काय होतं? याचा पोलीस तपास करत आहेत. तसेच सर्व ४० ते ५० आरोपींची शोधाशोध सुरू करण्यात आली आहे.

आदित्य महाविद्यालयात ११ वीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या निधनाची माहिती मिळताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी आदित्यला रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. सदर घटनेमुळे नवी मुंबई तुर्भे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. आदित्यला न्याय मिळावा यासाठी नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Airoli Tourism : फॅमिली फ्रेंड्ससोबत फिरण्यासाठी ऐरोलीजवळ आहेत ही 8 सीक्रेट ठिकाणं

Spg Commando Training: पंतप्रधानांचे सुरक्षा रक्षक SPG कमांडो होण्यासाठी काय आहे प्रोसेस? कशी केली जाते भरती? जाणून घ्या

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय|VIDEO

हद्द झाली! पुण्यात वाहतूक पोलिसाच्या अपहरणाचा प्रयत्न, दिवसाढवळ्या नेमकं झालं काय?

Laxman Hake : लक्ष्मण हाके यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

SCROLL FOR NEXT