Turbhe Crime News: एफडीएची मोठी कारवाई; 2.24 कोटींचा लवंग कांडीचा साठा केला जप्त

या कारवाईत 160111 किलो वजनाचा लवंग कांडीचा साठा जप्त करण्यात आला असून या साठयाची एकूण किंमत 2,24,15,540/ (2.24कोटी)-रुपये इतकी आहे.
Turbhe Crime News
Turbhe Crime NewsSaam tv
Published On

संजय गडदे

Turbhe News:

अन्न व औषध प्रशासनाने तुर्भे एमआयडीसीतील एका गोडाऊनवर छापेमारी करत तब्बल 2.24 कोटीचा लवंग कांडीचा साठा जप्त केला आहे. एफडीए अधिकाऱ्यांनी मे.रिषी कोल्ड स्टोरेजवर छापेमारी करून ही कारवाई केली. (Latest Marathi News)

या छापेमारी कारवाईत हलक्या दर्जाचे मसाले पावडर आणि लवंग पावडर तयार करण्यासाठी तसेच लवंगमध्ये भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लवंग कांडीचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त करण्यात आला आहे. हा साठा अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींचा भंग करणारा असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 160111 किलो वजनाचा लवंग कांडीचा साठा जप्त करण्यात आला असून या साठयाची एकूण किंमत 2,24,15,540/ (2.24कोटी)-रुपये इतकी आहे.

Turbhe Crime News
Nashik Crime News: मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केल्याने मारहाण करत तरुणाची हत्या; अंबडमधील धक्कादायक प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईच्या तुर्भे एमआयडीसीमधील मे रिशी कोल्ड स्टोरेजमध्ये हलक्या दर्जाचे मसाले पावडर आणि लवंग पावडर तयार करण्यासाठी, लवंगमध्ये भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लवंग कांडीचा मोठ्या प्रमाणात साठा केल्या संदर्भातील गुप्त माहिती एमडीए अधिकाऱ्यांना मिळाली होती.

या गुप्त माहितीनुसार प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे, यांच्या निर्देशानुसार सह आयुक्त (दक्षता) समाधान पवार व कोकण विभागाचे सह आयुक्त,सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (दक्षता/गुप्तवार्ता) उल्हास इंगवले, अन्न सुरक्षा अधिकारी, अरविंदकुमार खडके राहुल ताकाटे यांच्या पथकाने ही छापेमारीची कारवाई केली. या कारवाईदरम्यान लवंग कांडीचा 160111 किलोचा साठा जप्त करण्यात आला त्या जप्त लवंग कांडीच्या साठयाची एकूण किंमत रुपये 22415540/- इतकी आहे.

Turbhe Crime News
Nashik Crime News: २५ पेक्षा जास्त वार करुन तरुणाला संपवलं, घटनेनं नाशिक हादरलं

जप्त करण्यात आलेल्या साठयातून 7 लवंग कांडीचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आलेले आहेत.अन्न नमुन्यांचे अहवाल प्रलंबित असून अहवाल प्राप्त होताच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com