Mumbai Crime News Saam Tv
क्राईम

Mumbai Crime: सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवलं, जेष्ठ नागरिकाला लाखोंना लुटलं, नवी मुंबईतील धक्कादायक घटना

Cyber Fraud: आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून त्याच्याकडून अनेक मोबाईल फोन, सिम कार्ड तसेच एटीएम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

Gangappa Pujari

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई|ता. २८ डिसेंबर २०२३

Navi Mumbai Fraud News:

वाढत्या सोशल मीडियाच्या वापरामुळे इंटरनेट आणि विविध समाजमाध्यमांवर सायबर गुन्हेगारांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. सेक्सटॉर्शन, आक्षेपार्ह मजकूर, अश्लीलता, मॉर्फिंगमधून फसवणूक करण्याचे प्रकार वाढताना दिसत आहे. नवी मुंबईमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नवी मुंबई (Navi Mumbai) परिसरातील एका जेष्ठ नागरिकाला सोशल मीडियाची मैत्री चांगलीच महागात पडला आहे. आरोपीने व्हाट्सअपच्या माध्यमातून जेष्ठ नागरिकाशी संपर्क साधत व्हिडिओ कॉलवर नग्न होण्यास प्रवृत्त केले. हा व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग करुन तो व्हायरल करण्याची धमकी देत जेष्ठ नागरिकाकडे पैशाची मागणी केली.

व्हिडिओ व्हायरल होण्याच्या भितीने पिडीत नागरिकाने आरोपीने सांगितल्याप्रमाणे विविध बँक खात्यात तब्बल 43 लाख 22 हजार 900 रुपये पाठवले. मात्र त्यानंतरही आरोपीने वारंवार ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केल्याने अखेर पीडित जेष्ठ नागरिकाने नवी मुंबई सायबर पोलिसांना तक्रार केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी तात्काळ तपास करत राजस्थानमधील (Rajasthan) डिग जिल्ह्यातील पालदी गावात राहणाऱ्या आरोपीला अटक केली. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून त्याच्याकडून अनेक मोबाईल फोन, सिम कार्ड तसेच एटीएम कार्ड जप्त केलेत. सायबर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून त्याच्या इतर साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Maharashtra politics : अमित शाहांचा थेट उद्धव ठाकरेंच्या खासदाराला फोन, राजकीय खेळी की फक्त शुभेच्छा?

ऑपरेशन सिंदूरवर आज चर्चा, अधिवेशन तापणार; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होणार | Operation Sindoor

Amboli Tourism : आंबोलीजवळ असलेला छुपा धबधबा, इथं जाताच येईल फॉरेनचा फिल

Bhimashankar Temple: त्र्यंबकेश्वरनंतर भिमाशंकर मंदिरातही गळती, पहिल्या श्रावणी सोमवारमुळे मोठी गर्दी; भाविकांचे हाल, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT