Belapur Crime Saam tv
क्राईम

Belapur Crime : भयंकर! शेजाऱ्याचा ९ महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने वार; आईने वाचवला मुलाचा जीव, घटना कॅमेऱ्यात कैद

Belapur Crime News : बेलापुरात शेजाऱ्याने अवघ्या ९ महिन्यांच्या निष्पाप बाळावर कुऱ्हाडीने वार केला आहे. या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाला आहे.

Vishal Gangurde

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही

बेलापूर : नवी मुंबईतील बेलापूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. बेलापुरात क्षुल्लक कारणावरून हाणामारीची भयंकर घटना घडली आहे. शेजाऱ्याने ९ महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बेलापूरमधील पंचशीलनगर झोपडपट्टीत शेजाऱ्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात भयंकर घटना घडली आहे. शेजाऱ्याने ९ महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना घडली आहे. ९ महिन्यांच्या बाळाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून आरोपी फरार झाला आहे. या प्रकारानंतर आरोपीच्या विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

९ महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने वार करणाऱ्या शेजाऱ्याविरोधात बेलापुरातील एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध घेण्यात येत आहे. या हल्ल्यात ९ महिन्यांचा चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. या चिमुकल्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

सीसीटीव्हीमध्ये काय दिसत आहे?

शेजाऱ्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या वादानंतर दोन्ही शेजाऱ्यात मोठा वाद झाला. या वादादरम्यान, शेजारी कुऱ्हाड घेऊन घरात शिरला. त्यानंतर या शेजाऱ्याने रागाच्या भरात थेट चिमुकल्या बाळावर कुऱ्हाडीने वार केला. या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाला. त्यानंतर या चिमुकल्याला जीव वाचवण्यासाठी आई धावली.

आईने चिमुकल्याला कवटाळून हल्लेखोराचा हल्ला परतवून लावला. त्यानंतर हल्लेखोर शेजाऱ्याने पळ काढला. शेजाऱ्याने कुऱ्हाडीने हल्ला केल्यानंतर परिसरातील लोक घराबाहेर आले. या घटनेने लोकांमध्ये भीती पसरली. या प्रकारानंतर आरोपी अद्याप पोलिसांच्या हाताला लागला नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजपची मोठी खेळी! शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याने समर्थकांसह हाती घेतलं 'कमळ'

Morning Breakfast Recipe: नाश्त्याला दररोज मोड आलेले कडधान्ये खाल्ले तर शरीराला काय फायदा होतो?

Maharashtra News Live Update: चुकीच्या पोस्टवर सीईटी कक्ष करणार कायदेशीर कारवाई

Weather Update : पाऊस थैमान घालणार! पुढील ८ तास महत्त्वाचे; १३ राज्यांना अलर्ट जारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, २ महिलेसह चौघांना अटक; दिल्ली कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT