Crime News Google
क्राईम

Crime News: खळबळजनक! कुत्र्याच्या भुंकण्याला कंटाळून ६५ वर्षीय महिलेवर हल्ला, नेरूळमधील घटना

Rohini Gudaghe

Navi Mumbai Crime News Attacked On Woman

अनेकांना पाळीव प्राणी पाळायला आवडतात. नवी मुंबईतील नेरूळमधील एका ६५ वर्षीय महिलेने एक कुत्रा पाळला होता. तो खूप भू्ंकत (Dog Repeatedly Barking) होता. त्यामुळे शेजारच्या काही लोकांना त्याचा त्रास झाला. त्यांनी संतापाच्या भरात त्या ६५ वर्षीय महिलवर हल्ला केला. तिच्या घरात जाऊन तिला मारहाण केल्याची घटना घडली (Attacked On Woman) आहे. (Latest Crime News)

नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) रविवारी अशा दोन घटना घडल्या आहेत. दोन कुटुंबातील सदस्यांवर कुत्र्यांमुळे केलेल्या कथित हल्ल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी रविवारी दोन गुन्हे दाखल केले. दोन्ही प्रकरणांची माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी रात्री नेरुळमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कुटुंबांवर हल्ले झाले आणि पीडितांना दुखापत झाली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नवी मुंबईतील घटना

पहिल्या घटनेत कुत्र्याच्या वारंवार भुंकण्याला कंटाळून एका कुटुंबातील पाच सदस्यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या ६५ वर्षीय महिलेसोबत भांडण केलं (Attacked On 65 Year Old Woman) आहे. आरोपींनी पीडित महिलेच्या घरात बळजबरीने प्रवेश केला. नंतर त्या महिलेवर शारिरीक हल्ला करण्यापूर्वी शिवीगाळ केली, असं नेरुळ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने रविवारी या संदर्भात नोंदवलेल्या गुन्ह्याच्या हवाल्याने सांगितलं आहे.

दुसऱ्या घटनेत, भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या २४ वर्षीय महिला आणि तिच्या बहिणीसोबत म्हात्रे कुटुंबीय आणि इतर काही जणांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपींनी महिलेच्या घरात घुसून तिला आणि तिच्या कुटुंबीयांना मारहाण (Navi Mumbai Crime) केली. पोलिसांनी दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध महिलांवर अत्याचार करणे किंवा त्यांच्या प्रतिष्ठेचा अपमान करणे, बळजबरी करणे, धमकावणे आणि दुखापत करणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती आज तकच्या वृत्तानुसार मिळत आहे.

हरियाणातील घटना

एक दिवसापूर्वी हरियाणातील बहादूरगडमध्ये भटक्या कुत्र्याला (Dog) दुचाकीला बांधून ओढून नेल्याची घटना समोर आली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध प्राण्यांवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल (Crime News) केला.

आरोपीने सांगितलं होतं की, हा भटका कुत्रा रस्त्यावरील लोकांना चावत होता. आरोपीने काही प्राणी पाळल्याचं पोलीस तपासात समोर आलं (Dog Barking) आहे. भटका कुत्रा त्याच्या जनावरांच्या जवळ जायचा, त्यामुळे त्याला राग आला आणि त्याने कुत्र्याला दुचाकीला बांधून ओढले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT