Mundra Port : २१००० कोटींचे मुंद्रा पोर्ट अमली प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यातून फरार?

Mundra Port : पंजाबमधील अमृतसरमधून २१ हजार कोटी रुपयांच्या अमली प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलाय. त्याला गुजरातमधील कच्छ येथून अमृतसर येथे न्यायालयात हजर करण्यासाठी आणण्यात आले होते. आरोपी पसार झाल्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
Mundra Port
Mundra Portgoogle
Published On

Mundra Port Narcotics Case :

पंजाबमधील अमृतसरमधून २१ हजार कोटी रुपयांच्या अमली प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलाय. त्याला गुजरातमधील कच्छ येथून अमृतसर येथे न्यायालयात हजर करण्यासाठी आणण्यात आले होते. आरोपी पसार झाल्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. जोबनजीत सिंग संधू असे आरोपीचे नाव आहे. त्याला भुज कारागृहात ठेवण्यात आले होते.

दरम्यान या आरोपीला दुसऱ्या एका प्रकरणात अमृतसर न्यायालयात हजर करण्यात आले. या आरोपीला न्यायालयातून कच्छला परत आणत असताना तो पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला. सध्या त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंद्रा बंदर गुजरातमध्ये आहे. येथे २०२१ मध्ये २९८८ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते, ज्याची अंदाजे किंमत २१००० कोटी रुपये होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com