Navi Mumbai Crime News Saam Digital
क्राईम

Navi Mumbai Crime :बायकोचे नवऱ्याच्या ड्रायव्हरशी अनैतिक संबंध, नवी मुंबईतील बिल्डरच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा

Crime News: नवी मुंबईतील बिल्डर मनोज सिंगची पत्नी आणि पत्नीच्या प्रियकराने मिळून हत्याने केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Navi Mumbai Crime News:

नवी मुंबईतील बिल्डर मनोज सिंगची पत्नी आणि पत्नीच्या प्रियकराने मिळून हत्याने केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. १२ जानेवारी रोजी सीवूड्स सेक्टर ४४ मध्ये करावे गाव येथे ही घटना घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल्डरच्या पत्नीचे ऑफिसमध्येच बॉय, ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीशी प्रेमसंबंध होते. पतीला संपवून त्याची संपत्ती बळकावण्याचा पत्नी आणि प्रियकराचा हेतू होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींनी अटक करुन अधिक तपास सुरु केला आहे. (Latest News)

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शमशुद्दीन खान उर्फ राजू सिंग आणि पूनम अशी आरोपींची नावे आहेत. शमशुद्दीनने शुक्रवारी संध्याकाळी बिल्डरच्या डोक्यात रॉडने हल्ला केला होता, यात त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिल्डरची पत्नी पुनमने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. बिल्डरच्या मृत्यूनंतर त्याची संपत्ती स्वतः च्या नावावर करण्यासाठी हत्या करण्यात आल्याचे पुनमने पोलिसांना सांगितले.

हत्या कशी केली?

बिल्डरची हत्या झालेल्या दिवशी पुनमने राजूसाठी घरी जेवण बनवले होते. त्यामुळेच पोलिसांना आरोपी राजू सिंगवर संशय आला. पोलिसांनी याप्रकरणी पुनमची चौकशी केली असता या हत्येचा उलगडा झाला.

पुनम आणि राजूने मनोजच्या हत्येचा कट रचला. सर्वात आधी राजूने मनोजला सांगितले की, सोन्याच्या व्यवहारासाठी त्याला भेटायला के कुमार येणार आहे. त्यामुळे मनोज रात्री ऑफिसमध्ये थांबला. त्याचसोबत राजूने पुनमलाही खोटे बोलण्यास सांगितले होते की, जेणेकरुन बिल्डर कामानिमित्त रात्रभर ऑफिसमध्ये राहिल. त्यानंतर राजून मनोजच्या डोक्यात रॉडने हल्ला करुन त्याची हत्या केली. अशारीतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराने प्लानिंग करुन बिल्डरची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BSNL कडून ज्येष्ठ नागरिकांसाठी "सम्मान प्लॅन" लाँच, वर्षभरासाठी दररोज २ जीबी डेटा आणि कॉलिंग; किंमत किती?

Box Office Collection: 'थामा' आणि 'एक दीवाने की दीवानियात'मध्ये काटे की टक्कर; तिकिट खिडकीवर कोणी मारली बाजी?

Ravindra Dhangekar: 'कितीही कट कारस्थाने करा, मागे हटणार नाही', हकालपट्टीच्या चर्चेदरम्यान रवींद्र धंगेकरांची सूचक पोस्ट

दूध की रबर! उकळी फूटली अन् काही तासांत रबर झाला; VIDEO पाहून बसेल धक्का

Maharashtra Live News Update: सलग आलेल्या दिवाळी सुट्ट्यांमुळे कोकणात पर्यटन हंगामाला सुरूवात

SCROLL FOR NEXT