Nashik Crime News Saam Tv
क्राईम

Nashik Crime News: फक्त ५०० रुपयांचा वाद; मित्राने केली मित्राची हत्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

BY- तबरेज शेख, साम टीव्ही नाशिक

नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईल फोन गहाण ठेवण्यावरुन झालेल्या वादातून मित्राकडून मित्राची हत्या करण्यात आलेली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून या घटनेचा अधिकचा तपास करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोबाईल फोन गहाण ठेवण्यावरून झालेल्या वादातून दोघा मित्रांमध्ये हाणामारी झाली. यावेळी एक मित्राने त्याच्याजवळ असलेल्या धारधार शस्त्राने दुसऱ्या मित्रावर सपासप वार केले. यावेळी अय्युब शेख वय ३१ या तरुणाचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण घटना ही नाशिक शहरातील भारतनगर परिसरात ता.१९ रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटना (Event)स्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी आकिब सय्यद यास ताब्यात घेतले असून परिसरात दंगलनियंत्रण पथकाची तुकडीला तैनात करण्यात आले आहे.

नेमके काय घडले?

मुंबई नाका परिसरात भारत नगर येथे राहणाऱ्या आकीब याने स्वत:चा मोबाईल (Mobile)गहाण ठेवून ४,५०० रूपये परवेज याच्याकडून घेतले होते. मोबाईल पुन्हा मागितला असता त्यावरून त्यांच्या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. यावेळी भारतनगर झोपडपट्टीमधील मोकळ्या मैदानात आकिब याने त्याच्यावर धारधार चाकूने वार केले. यामुळे परवेज रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला तातडीने जवळच्या खासगी रूग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच मुंबईनाका पोलिस (Police)ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक गिरी Acp सिद्धेश्वर धुमाळ आणि गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर कड हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ परिसरातून संशयित आकिब यास ताब्यात घेण्यात आले असून परिसरात तणाव पूर्ण शांतता आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT