nashik crime news  saam tv
क्राईम

Crime News: हळदीच्या कार्यक्रमात रक्तरंजित खेळ, धारदार शस्त्राने 23 वर्षीय युवकावर वार, कारण काय?

Nashik Crime News: नाशिकमध्ये दिवसागणिक गुन्हेगारीच्या घटना वाढताना दिसत आहे, अशातच ग्रामीण भागातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Omkar Sonawane

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे हळदीच्या कार्यक्रमात एका तरुणाचा शिल्लक कारणावरून झालेल्या वादातून धारधार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी 19 तारखेला रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी एका तासाच्या आत तिन्ही संशयितांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्यावर पिंपळगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या गेट नंबर एक समोर हळदीचा कार्यक्रम सुरू असताना कार्यक्रमात शिल्लक कारणावरून वाद झाला. या वादात रवी सोमनाथ गुबांडे (23 रा. चिंचखेड) या युवकाच्या धारदार शास्त्राने हल्ला करण्यात आला होता. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्यावेळी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी काही वेळातच अंबिका नगर येथील संशयित हेमंत परसराम जाधव, जनार्दन ज्ञानेश्वर गांगुर्डे, रमेश मुरलीधर शेखरे या तीन आरोपीना पिंपळगाव येथून ताब्यात घेतले.

या खुनेची माहिती मिळताच तत्काळ पोलीस अधिक्षक अपराजिता अग्निहोत्री यांनी घटनास्थळी धाव घेत सदर आरोपीबाबत माहिती घेतली आणि तात्काळ पोलिस कर्मचाऱ्यांना आरोपींचा तपास करण्यासाठी सूचना केल्या. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत पिंपळगावात वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले.

मुख्य आरोपी हेमंत उर्फ नन्य जाधव हा पळून जाण्याच्या तयारीत होता त्यास पोलिसांनी शिताफीने पकडले. त्यानंतर इतर दोघेही पळून जाण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी नाकाबंदी करत गुप्त सूत्रांच्या मदतीने जनार्दन ज्ञानेश्वर गांगुर्डे व रमेश मुरलीधर शेखरे यांना देखील ताब्यात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan : मुंबईतील 'या' गणपतीचे विसर्जन नाही, गणरायाला पुन्हा चौपाटीवरून मंडपात आणणार, मंडळाने का घेतला निर्णय?

आजारपणामुळे मोठ्या भावाचा मृत्यू, निधनाचे वृत्त कळाताच धाकट्याने जागीच सोडलं प्राण; संपूर्ण गावावर शोककळा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Mika Singh: ९९ घरं, १०० एकर जमीन, मिका सिंहने इतकी संपत्ती कमवली कशी? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT