Shruti Vilas Kadam
बाजारातील हेअर प्रॉडक्ट्समध्ये जास्त रसायने असतात, त्यामुळे केसांना हानी होऊ शकते. त्यापेक्षा घरातील सामग्रींपासून तयार केलेला हा स्प्रे वापरुन पाहा.
हे स्प्रे बनवण्यासाठी वापरले जाणारे मुख्य घटक आहेत- एलोव्हेरा जेल, नारळ पाणी, गुलाब पाणी, आवळा पावडर, टी ट्री ऑइल आणि कॅस्टर ऑइल.
सर्व साहित्य एकत्र करून नीट मिसळावे, पावडर व्यवस्थित विरळेपर्यंत एकजीव करावे, नंतर हे मिश्रण स्प्रेच्या बाटलीत भरून चांगले मिक्स करावे.
थोड्या ओल्या केसांवर, विशेषतः मुळांवर हे स्प्रे लावावे. आठवड्यात 3–4 वेळा हा प्रयोग करुन पाहावा.
हा स्प्रे केसांच्या मुळांना मजबुती देतो, केसांच्या तुटण्यावर नियंत्रण ठेवतो, केस गळणे कमी करतो आणि नैसर्गिक चमक आणतो.
स्कॅल्पवरील कोरडेपणा व खाज यांची समस्या कमी करण्यास मदत करू शकतो.
या उपचाराचे परिणाम दिसण्यासाठी सतत आणि संयमी वापर आवश्यक आहे.