Nashik Crime News
Nashik Crime News Saam TV
क्राईम

Nashik Crime News: पैसे कमवण्यासाठी चोरट्यांनी लढवली अनोखी शक्कल; तपासात समोर आलेली माहिती पाहून पोलिसही चक्रावले

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

Nashik News:

नाशिकमध्ये सायबर गुन्हेगारीचा नवा प्रकार समोर आला आहे. एका खासगी कंपनीच्या OTT प्लॅटफॉर्मवरील कंटेट चोरून स्वतःच्या OTT ॲपवर प्रसारित करून कमाईचा नवा फंडा चोरट्यांनी शोधलाय. नाशिक सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान आणि कॉपीराईट ॲक्टनुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नाशिकमध्ये सायबर गुन्हेगारीचा नवा प्रकार समोर आलाय. सायबर गुन्हेगारीच्या या नव्या फंड्यामुळे पोलीस देखील चक्रावून गेलेत. एका प्रसिद्ध खासगी कंपनीच्या OTT प्लॅटफॉर्मवरील फिल्म, वेबसिरीज, व्हिडिओज असा कंटेंट चोरून तो स्वतः तयार केलेल्या फायर व्हिडिओ या OTT ॲपवर अपलोड करण्यात येत होता.

या माध्यमातून स्वतःच्या OTT ॲपचे सबस्क्राईबर्स वाढवून देश, विदेशातील या सबस्क्राईबर्सकडून पैसे वसूल केले जात होते. गेले अनेक महिने हा प्रकार सुरू होता. संबंधित खासगी OTT कंपनीचे कमी झालेले सबस्क्राईबर्स आणि पैसे यामुळे कंपनीच्या टीमने शोध घेतला असता, नाशिकमधील एका युवकाकडून हा प्रकार केला जात असल्याचं समोर आलंय.

सायबर गुन्हेगारीचा हा नवा प्रकार समोर आल्यानंतर नाशिकच्या सायबर पोलिसांत याप्रकरणी गौरव वडनेर या युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस देखील या सायबर गुन्हेगारीच्या फंड्याने चक्रावून गेलेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain Alert : मान्सून अंदमानात दाखल होताच वातावरण बदललं; या भागात तुफान पाऊस कोसळणार

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, २० मे २०२४ : मेषसह ४ राशींना मिळणार नशीबाची उत्तम साथ, तुमची रास कोणती?

Horoscope Today: तुमच्यासाठी सोमवार सुखाचा ठरेल की दुखाचा? वाचा राशिभविष्य

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

SCROLL FOR NEXT