Nashik second wife kills husband Saam Tv
क्राईम

Nashik Crime News : पहिल्या बायकोला वेळ देतो म्हणून दुसरी बायको चिडली, पतीची केली हत्या

Nashik News : नाशिकमधील आडगाव परिसरात ही भीषण घटना घडली आहे. पहिल्या बायको जास्त वेळ देतो, लग्नानंतर मुलं होत नाही यावरुन एका महिलेने तिच्या नवऱ्याची हत्या केली आहे. याप्रकरणी तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Yash Shirke

तबरेज शेख, साम टीव्ही, प्रतिनिधी

Nashik News : नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकमधील आडगाव-सय्यद पिंप्री रस्त्यावरील एका वस्तीवर एका महिलेने तिच्या पतीचा खून केला आहे. पहिल्या बायकोकडे जास्त वेळ राहत असल्याच्या कारणावरुन या महिलेने भावाच्या साथीने हे कृत्य केले आहे. या प्रकरणी महिलेसह तिच्या तीन भावांवर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेला पोलिसांनी अटक केली आहे तर अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

मृत व्यक्तीचे नाव भावसार मूलचंद पवार ऊर्फ बाल्या असे आहे. भावसार त्याची पहिली बायको निरमा आणि मुलगी यांना घेऊन नाशिकमधील आडगाव शिवारातील हिंदुस्थाननगर येथे राहणाऱ्या आई-वडिलांना भेटण्यासाठी आला होता. दरम्यान पहिल्या बायकोकडे जास्त वेळ असतो म्हणून भावसार आणि दुसरी बायको सुनीता यांच्यात वाद सुरु होता. लग्नानंतर त्यांना मुलं होत नव्हते यावरुन त्यांच्यात भांडण सुरु झाले.

सुनीताचे भाऊदेखील भांडणात सहभागी झाले. दिवसभर सुरु असलेला वाद वाढून हाणामारी सुरु झाली. सुनीता, तिचा भाऊ आणि अन्य दोन आरोपी मिळून भावसारला मारहाण करु लागले. त्यांनी मिळून भावसारला पकडले आणि सुनीताच्या भावाने त्याच्या पोटावर, पाठीवर आणि छातीवर धारदार चाकूने वार केले. एकाने त्याच्या डोक्यात रॉड टाकली.

रक्ताने माखलेला भावसार त्याच्या पहिल्या बायकोकडे गेला. पुढे त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणाची माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी मृताच्या दुसऱ्या बायकोला ताब्यात घेतले. अन्य आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची विविध पथक रवाना करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT