Nashik Satpur Murder  Saam Tv News
क्राईम

Nashik Crime : एकट्यात गाठलं, धारदार शस्त्राने वार; नाशिकमध्ये दिवसाढवळ्या एकाला संपवलं

Nashik Satpur Murder : अज्ञात व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आला असून, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच सातपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

Prashant Patil

नाशिक : नाशिकमधील सातपूर औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या संतोषीमाता नगर परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आला असून, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच सातपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या पंचनामा सुरू असून मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी हत्येमागचं कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला असून, काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या घटनेनंतर संतोषीमाता नगर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिकांमध्ये घबराट पसरली असून, पोलिसांकडून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंजीत नलावडे, क्राईम पी.आय. विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय निहालदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय जगताप, पोलीस कॉन्स्टेबल राकेश रसाळ , सागर गुंजाळ व हवालदार विश्वास पाटील आदी सातपूर पोलीस घटनास्थळी तपास करत आहेत.

वटपौर्णिमेच्या दिवशीच बायकोनं घात केला

सांगलीच्या कुपवाडमधील प्रकाशनगरमध्ये धक्कादायक प्रकार घडला. लग्नाच्या सतरा दिवसांतच एका महिलेने तिच्या नवऱ्याचा जीव घेतला. वटपौर्णिमेच्या रात्री आरोपी महिलेने तिच्या नवऱ्यावर कुऱ्हाडीने वार केले. हल्ल्यात महिलेचा नवरा जागीच ठार झाला. या घटनेमुळे आसपासच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीतील कुपवाडच्या प्रकाशनगरमधील एकता कॉलनीत अनिल तानाजी लोखंडे (वय ४५) याची हत्या झाली. वटपौर्णिमेच्या रात्री साडेअकरा ते साडेबाराच्या सुमारास अनिलच्या बायकोने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. डोक्यावर कुऱ्हाडीचा वार झाल्याने अनिल लोखंडेचा जागीच मृत्यू झाला. अनिलचे सतरा दिवसांपूर्वी दुसरे लग्न झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यात नगरपरिषद मतदार यादीत घोळ

Pune Police: पुण्यात १७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, कुणाची कुठे झाली बदली? वाचा संपूर्ण लिस्ट

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

SCROLL FOR NEXT