Nashik Crime News Saam Digital
क्राईम

Nashik Crime News: किरकोळ वादातून रिक्षाचालकानेच केला रिक्षाचालकाचा खून; तिघेजण पोलिसांच्या ताब्यात, नाशिकमधील घटना

Rickshaw Driver Killing Case: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका रिक्षाचालकाने दुसऱ्या रिक्षाचालकाचा खून केलाय. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

Rohini Gudaghe

Nashik Crime Rickshaw Driver Killed

नाशिकमध्ये (Nashik) सध्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. चुंचाळेत एका रिक्षाचालकाने दुसऱ्या रिक्षाचालकाचा खुन केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. नक्की काय घडलं होतं, ते आपण पाहू या. (Latest Crime News)

अंबड औद्योगिक वसाहती जवळील चुंचाळे घरकुल योजना भागात एका रिक्षाचालकाने किरकोळ कारणावरुन दुसऱ्या रिक्षाचालकाचा खून केला (rickshaw Driver Killing Case Chunchale) आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. शंकर गाडगीळ (वय ३८) असं मृत व्यक्तीचं नाव आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

किरकोळ वादातून हत्या

चुंचाळे घरकुल योजना भागात काल रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून संशयित रिक्षाचालक सोनु कांबळे, त्याचा भाऊ महेंद्र कांबळे आणि एक अल्पवयीन यांच्यात वाद झाला होता. या वादाचं रूपांतर हाणामारीत (Nashik Crime News) झालं होतं.

या घटनेत शंकर गाडगीळ याच्या डोक्यात लाकडाने मारलं. त्यामुळे शंकर गाडगीळ गंभीर जखमी झाला होता. जखमी शंकर गाडगीळ यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेव्हा डॉक्टरांनी मृत घोषीत (Rickshaw Driver Killed) केलं. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.

तिघांना ताब्यात घेतलं

या प्रकरणी चुंचाळे अंबड औद्योगिक वसाहत पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदिप पवार, पोलीस हवालदार ढाकणे व पथक घटनास्थळी धाव (Nashik Crime) घेतली.

पोलिसांनी घटनेनंतर लगेच संशयित रिक्षाचालक सोनु कांबळे व त्याचा भाऊ महेंद्र कांबळे व एक अल्पवयीन या संशयितांना ताब्यात घेतलं (Crime News) आहे. मयत व संशयित आरोपी हे चुंचाळे घरकुल भागात राहणारे आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT