Police officials investigate at Gavlewadi village in Tuljapur taluka after the arrest of the accused in the toddler murder case. Saam tv
क्राईम

शाळेच्या गेटसमोरच दहावीच्या विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला; नाशिकमधील धक्कादायक घटना

Nashik Crime Attack On SSC Student: एका दहावीच्या विद्यार्थ्यावर परीक्षा केंद्राबाहेर १०-१५ तरुणांच्या टोळीनं हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Bharat Jadhav

  • नाशिकमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यावर परीक्षा केंद्राबाहेर हल्ला.

  • १० ते १५ जणांच्या अज्ञात टोळक्याकडून धारदार शस्त्राने हल्ला.

  • विद्यार्थी गंभीर जखमी; उपचारासाठी रुग्णालयात दाखल.

नाशिक शहरातील जिल्हा सत्र न्यायालयासमोरील न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट येथील शाळेत एका विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. दहावी परीक्षा केंद्रावर बुधवारी दुपारच्या सुमारास एका विद्यार्थ्यावर १० ते १५ जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबधित विद्यार्थी दहावीचा पेपर देण्यासाठी न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट या परीक्षा केंद्रावर आला होता. दुपारी पेपर सुटल्यानंतर तो शाळेच्या मुख्य गेटमधून बाहेर पडला. त्यावेळी दबा धरून बसलेल्या १० ते १५ जणांच्या अज्ञात टोळक्याने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. यात तो गंभीर जखमी झाला. तर हल्ल्यानंतर टोळक्याने तेथून पळ काढला.

या घटनेनंतर जखमी झालेल्या विद्यार्थ्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. तसेच संशयित आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

पोलिसांनी जखमी विद्यार्थ्याचा जबाब नोंदविला आहे. शालेय गणवेशातील मारेकऱ्यांपैकी एकाही मुलाला तो ओळखत नसल्याचे त्याने सांगितले. होमगार्ड कार्यालयाबाहेर मारेकऱ्यांनी पाठीमागून येत शस्त्राने त्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर वार केल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, याप्रकरणी जखमी विद्यार्थ्याच्या पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. परीक्षा केंद्र असलेल्या शाळेच्या शिक्षकांना जाब विचारत धारेवर धरले. मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात मारेकरी मुलांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदूरबारमध्ये शेतात जखमी अवस्थेत आढळले बिबट्याचे बछडे

बदल्यांचा धडाका सुरूच! दोन IAS अधिकाऱ्यांची बदली

'मारू नका नं...! बायको रडत विनवण्या करत होती,पण...; ऊसतोड मजुराला बागायतदाराकडून काठीने बेदम मारहाण|Video Viral

Kalyan News : भाजप आणि शिंदे गटात दुरावा? सत्तेत असूनही मनोमिलन नाही, नेमकं कोणत्या पदावरून बिनसलं?

गॅस तुटवड्यावरून लोकसभेत वातावरण तापलं; देशात CNG, LPG गॅसची स्थिती काय? केंद्रीय मंत्री हरदीप पुरींनी सगळं सांगितलं

SCROLL FOR NEXT