Sakshi Sunil Jadhav
सध्या अनेकांना फिटनेस फॉलो करायचा प्रचंड आवडतं. त्यामुळे ते डाएट फॉलो करतात.
बऱ्याचदा डाएटमध्ये चटपटीत स्ट्रीट फूड खाण्याची जास्त इच्छा होते. अशावेळेस तुम्ही पुढील ७ स्ट्रीट फूड्स खाऊ शकता.
सगळ्यांची आवडती डीश म्हणजे भेळपूरी. यामध्ये कमी कॅलरीज असतात.
तुम्ही डाएटमध्ये दही पापडी चाट कधीतरी खाऊ शकता. याने प्रोटीन मिळतं आणि पोट सुद्धा भरतं.
ज्यामध्ये चिंचेची चटणी आणि साखर जास्त प्रमाणात असते ते पदार्थ खाणं टाळा.
तुम्ही कमी तेलातलं ओमलेट किंवा भूर्जीपाव कधीतरी चवीला खाऊ शकता.
तुम्ही मेयोनीज न घातलेलं, किंवा जास्त ब्रेड असलेले पदार्थ खाणं टाळा.
कमी तेलातला किंवा तुपातला पराठा तुम्ही डाएटमध्ये खाऊ शकता.
तुम्ही कोल्ड ड्रिंक्स ऐवजी नारळपाणी किंवा लिंबू पाणी सेवन करु शकता.