Nashik Crime 
क्राईम

Nashik Crime: तरुणाच्या त्रासाला कंटाळून १५ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या, शेवटचा CCTV आला समोर

15 year-old Girl Student Killed Herself: नाशिकमधील देवळाली गावात एक धक्कादायक घटना घडलीय. येथे एका १५ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केलीय. या प्रकरणाचा एक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलाय.

Bharat Jadhav

अभिजीत सोनवणे, साम प्रतिनिधी

नाशिकमधील देवळाली गावात एका १५ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली. तरुणाच्या त्रासाला कंटाळून या विद्यार्थिनीची आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय. या घटनेचा एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला असून या प्रकरणाला घातपाताची किनार असल्याची शक्यता आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे ही आत्महत्या होती की घातपात असा संशय व्यक्त केला जात आहे.

सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये दुचाकीवर एक मुलगा आणि एक मुलगी दिसत आहे. मुलाच्या पाठिमागे बसलेल्या मुलीने त्या दोघांच्या मध्ये बसलेल्या एकाला दोन्ही हातांनी धरले असल्याचं दिसत आहे. त्यामुळे हा घातपातच असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान सीसीटीव्ही व्हिडिओच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कलीम मंसुरीसह १० आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

दरम्यान या घटनेसंदर्भात प्राथमिक माहितीनुसार, मृत विद्यार्थिनीला एक मुलगा नेहमी त्रास देत होता. विद्यार्थिनी शाळेत जातांना येतांना हा तरुण तिची छेडछाड करायचा. तब्बल दीड ते दोन वर्षेापासून विद्यार्थिनीसोबत हा प्रकार सुरू होता. लग्न कर नाहीतर तुझ्या कुटुंबीयांना जिवे मारेल अशी धमकी हा तरूण तिला देत होता. जवळपास दोन वर्षापासून सुरू असलेल्या या त्रासाला कंटाळून या विद्यार्थिनीने विषारी पदार्थाचे सेवन करून आत्महत्या केली. या प्रकरणात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता या प्रकरणात घातपाताचा संशय येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT