nangole villagers andolan at kavathe mahankal police station  Saam Digital
क्राईम

Sangli: कवठेमहांकाळ रुग्णालयासह पाेलिस ठाण्यात नांगोळे ग्रामस्थांचे आंदाेलन, युवकास मारहाण केल्याचा पाेलिसांवर आराेप

kavathe mahankal police station: पोलिस अधिकाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी अर्धनग्न होत ठिया आंदोलन केले. तसेच कवठेमहांकाळ पोलिस ठाणे येथे देखील आंदाेलन केले.

विजय पाटील

एका युवकाच्या आत्महत्येच्या घटनेनंतर मृत युवकाच्या भावाला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आराेप करत नांगोळे ग्रामस्थांनी पाेलिसावर कारवाईची मागणी करत सांगली येथील कवठेमहांकाळ येथे रात्रीच्या सुमारास आंदाेलन केले. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदाेलक शांत झाले.

कवठेमहांकाळ तालुक्यातल्या नांगोळे येथील सौरभ संजय वाले या युवकाने गुरुवारी आत्महत्या केली. मृत सौरभ याचा भाऊ आश्लेष संजय वाले याला पाेलिसांनी मारहाण केल्याचा आराेप करत सौरभ याच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यामुळे कवठेमहांकाळ रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पैशाची मागणी करत पाेलिसांनी आश्लेष याला मारहाण केल्याचा आरोप संबंधितांनी केला आहे. यावेळी संतप्त मृत कुटुंबासह नांगोळे ग्रामस्थांनी कवठेमहांकाळच्या उपजिल्हा रुग्णालयासमोर मारहाण करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाईच्या मागणीसाठी अर्धनग्न होत ठिया आंदोलन केले. तसेच कवठेमहांकाळ पोलिस ठाणे येथे देखील आंदाेलन केले.

कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदाेलक शांत झाले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: मित्रांकडून प्रेरणा घेत सुरु केली UPSCची तयारी, सलग ४ वेळा अपयश, IPS वैभव बँकर यांचा प्रवास

Manoj jarange patil protest live updates: जरांगे पाटलांना भेटण्यासाठी आंदोलकांनी केली गर्दी

Mahayuti 2025: 100 वर्षांनंतर सूर्य, बुध आणि मंगळ बनवणार त्रिग्रही योग; 'या' राशींना प्रत्येक कामात मिळणार यश

Tuesday Horoscope : लाडका गणपती भक्तांवर प्रसन्न होणार; वृषभसह ५ राशींच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडणार

Maratha Reservation : मराठा आंदोलन हाताळण्याबाबत कोर्टाचे महत्वाचे आदेश; सरकारची कसोटी लागणार, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT