nanded police arrests three in hiting senior citizen Saam Digital
क्राईम

Nanded Crime News: गुंडाचा नांदेड पाेलिसावर गोळीबार, धुमश्चक्रीनंतर तिघांना अटक

Nanded Latest Marathi News : पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरविली. या घटनेच्या सहा तासाच्या आत तीन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

नांदेड शहरातील अष्टविनायक नगर येथे गोळीबार करून वृद्धाला लुटणाऱ्या संशयित आरोपींना एलसीबीने सहा तासाच्या आत अटक केली. संशयित आरोपीकडून एक बंदूक, दोन मोटारसायकल आणि 40 हजार रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली. (Maharashtra News)

नांदेड शहरातील अष्टविनायक नगरात काल दुपारी गोळीबाराची घटना घडली होती. रवींद्र जोशी या वृद्ध व्यक्तीवर गोळीबार करून 40 हजार रुपये लुटून आरोपी फरार झाले होते. हा संपूर्ण प्रकार एका व्यक्तीने मोबाईल मध्ये कैद केला होता.

पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरविली. या घटनेच्या सहा तासाच्या आत तीन संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली. या अटके दरम्यान एका संशयित आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला होता. त्याला प्रतिउत्तर देत स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पोलिस अधिकाऱ्याने देखील स्वतःच्या संशयिताच्या पायावर गोळी झाडून जखमी केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विशेष म्हणजे यातील दोन आरोपी पंजाब राज्यातील असून एक आरोपी नांदेड शहरातील आहे. या आरोपींकडून एक बंदूक, दोन मोटारसायकल आणि 40 हजार रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप मंत्र्याच्या मुलाचा माज, कारने अनेकांना उडवलं; नंतर जमलेल्या स्थानिक लोकांवर पिस्तुल ताणली

Iran vs US Tensions: खामेनेईंच्या टार्गेटवर सुन्नी देश, इराणचे खतरनाक चार प्लॅन

Crime News: दिप्तीनंतर आता कीर्ती! बाथरुममध्ये कोंडलं, बेदम मारलं; १०लाखांसाठी अमानुष छळ; आणखी एका विवाहितेनं संपवलं आयुष्य

चंद्रपूरचा महापौर भाजपचा की काँग्रेसचा? महापालिकेची सूत्रं 'मातोश्री'च्या हाती? VIDEO

Special Report : महायुतीत ठणाठणी! शिंदेसेनेचं भाजपच्या नाईकांना ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT