Nanded Crime News Saam TV
क्राईम

Nanded Crime: आमच्याकडे का बघतो म्हणत मारहाण; टोळक्याकडून तरुणाची हत्या; घटनेने नांदेड हादरलं

Nanded News: क्षुल्लक कारणावरून तरुणाला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत हत्या केल्याची घटना शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

संजय सुर्यवंशी, नांदेड| ता. २९ डिसेंबर २०२३

Nanded Crime News:

नांदेड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून तरुणाला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत हत्या केल्याची घटना शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Crime News in Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, क्षुल्लक कारणावरून युवकाचा खुन केल्याची घटना नांदेडच्या (Nanded) शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. तू माझ्याकडे का बघतोस? म्हणत 7 ते 8 जणांनी लाथा-बुक्क्या मारून युवकाची हत्या केली. व्यंकटेश वल्लमवार असे या हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

शहरातील वसंतराव नाईक चौकातील नागार्जुन हॉटेल समोर व्यंकटेश वल्लमवार या युवकाची पानटपरी आहे. ती बंद करून व्यंकटेश हा पाणी पिण्यासाठी हॉटेलात गेला. त्यावेळी दारू पित बसलेल्या युवकांनी तु आमच्याकडे का बघतोस? असे म्हणत ७ ते ८ तरुणांनी व्यंकटेशला लाथा-बुक्क्या मारहाण करायला सुरुवात केली.

या बेदम मारहाणीत व्यंकटेशचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून सध्या आरोपींचा शोध सुरू आहे. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS नेहा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Maharashtra Live News Update: पुण्यातील चारही धरणे जवळपास ९० टक्के भरली

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

श्रावण सोमवारी पहाटे दुर्घटना, मंदिरात विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, 38 भाविक जखमी

SCROLL FOR NEXT