Nalasopara Crime News Saam tv
क्राईम

Nalasopara Crime News: व्हिडिओ रेकॉर्डिंगवरून वाद टोकाला,भडकलेल्या प्रवाशाने ट्रॅफिक हवालदाराचा दातच तोडला

Vasai News: नालासोपाऱ्यामधील तुळीज पोलीस ठाण्यात एका ट्रॅफिक पोलीस हवालदाराला मारहाण करण्याची घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नालासोपाऱ्यामधील तुळीज पोलीस ठाण्यात एका ट्रॅफिक (traffic )पोलीस हवालदाराला मारहाण करण्याची घटना घडली आहे. या झालेल्या मारहाणीत पोलिसाचा दात तुटला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सर्व घटना नालासोपारा पूर्वेमधील एका उड्डाणापूलाजवळ सोमवरी २२ एप्रिल रोजी घडली. सोमवारी दुपारी दिडच्या सुमारास पोलीस हवालदार प्रवीण रानडे (वय३३) हे नालासोपारा (Nalasopara) पूर्वेच्या उड्डाणपूलाजवळ कर्तव्यावर होते.

त्याचवेळी संबंधित प्रवाशी शैलेश वाघेला (वय ३६) उड्डाणपूलावरुन ऑटो रिक्षामधून जाताना होता. मात्र तो रिक्षामधून जाताना रानडे यांचे मोबाईलमधून चित्रिकरण करतो. या गोष्टीचे कारण रानडे यांनी शैलेशला विचारले. मात्र शैलेशने पोलीस हवालदार रानडे यांना उद्धटपणे बोलत त्यांच्यावर शिवीगाळ केली. त्यामुळे रानडे यांनी शैलेशला पोलीस ठाण्यात नेले.

रानडे पोलीस हवालदार शैलेसला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्यानंतर रानडे यांनी घडलेला सर्व प्रकार पोलीस ठाण्यात ऑन ड्युटीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगितला. मात्र रागात असलेल्या शैलेशने पुन्हा एकदा रानडे यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. या पोलीस ठाण्यात शैलेशने रानडे यांना केलेल्या मारहाणीत रानडे यांच्या उजव्या बाजूचा दात तुटला.

पोलीस ठाण्यात अचानक झालेल्या या प्रकारामुळे अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी रानडे यांची शैलेशकडून सुटका केली परंतू या प्रकाराने पोलीस ठाण्यात मोठी खळबळ उडाली. सध्या आरोपी शैलेसला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

त्यावर तुळीज पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणि मारहाण केल्याप्रकरणी आरोपी शैलेश वाघेला याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र शैलेशने व्हिडीओ रेकॉर्ड करण्यामागील हेतू अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरु केला आहे. या आधीही पोलीस ठाण्यातच पोलिसांवर हात उचलण्याच्या घटनांत वाढ होऊ लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

SCROLL FOR NEXT