nagpur crime  saam tv
क्राईम

Nagpur Crime : पूजा करण्याच्या बहाण्यानं साधूच्या वेशातील बंटी-बबलीने वृद्ध दाम्पत्याकडून पळवले दागिने

Nagpur Crime: साधूच्या वेशात आलेल्या चोरांनी वृद्ध दाम्पत्याकडून दागिने पळवल्याची घटना समोर आलीय.

Bharat Jadhav

Nagpur Crime :

प्रकृती ठीक राहावी, यासाठी साधूंकडून उपाय घेणं वृद्ध दाम्पत्याला महागात पडलं. साधूच्या वेशात आलेल्या चोरट्यांनी पूजा करण्याच्या बहाण्याने दागिने आणि रोख १० हजार रुपये घेऊन वृद्ध दाम्पत्याला गंडा घातला. ही घटना नागपुरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी येथील योगेश्वरीनगरात घडली. (Latest News)

साधूच्या वेशात आलेल्या व्यक्तींमध्ये एकजण पुरुष होता तर एक महिला होती. या दोघांनी वृद्ध जोडप्याच्या भोळ्यापणाचा फायदा घेत त्यांची फसवणूक केलीय. साधूरराम बळीराम दमाहे (वय ६६) असे वृद्धाचे नाव आहे. साधूराम दमाहे यांची आणि पत्नी यांच्या प्रकृती ठीक राहत नसल्याने त्यांनी साधूंकडून उपाय घेण्याचं ठरवलं. दरम्यान अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी उपचार घेतले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पण त्याचा काही फायदा झाला नाही. यामुळे आता काही चत्मकारिक शक्तीचं आपली समस्या ठीक करेल असं त्यांना वाटू लागलं. त्याचदरम्यान त्यांच्या गावात साधू वेशधारी पुरूष आणि एक महिला येत होते. त्यांच्याकडून आपण उपाय जाणून घ्यावा असं वृद्ध जोडप्यानं ठरवलं. बनावट सांधूंना या दाम्पत्यानं बोलवलं तेव्हा त्यांच्या घरात अनिष्ट शक्तीचे वास्तव्य आहे. त्यामुळे तुम्हाला पूजा करावी लागेल, असं या बनावट सांधूंनी सांगितलं.

या अनिष्ठ शक्ती बाहेर काढण्यासाठी घरात पूजा करावी लागेल असा सल्ला दिला. यावेळी साधूराम यांना नारळ देत, ते शंकराचा मंदिरात फोडण्यास सांगितले. याशिवाय त्यांच्या पत्नीला पूजेत ठेवण्यासाठी घरातील दागिने आणि पैसे आणण्यास सांगितले. त्यातून त्यांनी घरातील सोन्याचे दागिने व रोख १० हजार रुपये पूजेसाठी दोघांनाही आणून दिले.

त्यावेळी या चोरांनी साधूराम यांच्या पत्नीला घरातील देवघरात पाठवून दागिने आणि पैसे घेऊन पळून गेले. परत येताच दोघेही न दिसल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : धुक्याने वेढलेले डोंगर अन् निसर्गाचे मनमोहक नजारे, पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट खारघरमधील 'हे' ठिकाण

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; हाताला दुखापत, अंथरुणावरून उठणेही झाले कठीण

धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

SCROLL FOR NEXT