Nagpur Crime News Saam TV
क्राईम

Nagpur Crime News : अमित शहांच्या नावाचा गैरवापर करत व्यापाऱ्याला १ कोटींचा गंडा; नागपुरमधील खळबळजनक घटना

Crime News : पैसे उकळण्यासाठी या टोळक्याने मोठा प्लान रचला. सुरुवातीपासून त्यानी फिर्यादी व्यक्तीस वेगवेगळ्या ठिकाणी नेले आणि विविध व्यक्तींशी भेट करून दिली. असे करून तब्बल १ कोटी रुपये आरोपींनी उकळले.

साम टिव्ही ब्युरो

Nagpur :

सायबर क्राइमच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अशात नागपुरमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. चोरट्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाचा गैरवापर केला आहे. अमित शहांचे नाव घेत एका व्यापाऱ्याला १ कोटींचा गंडा घालण्यात आला आहे.

सीएसआर फंडाच्या नावाखाली मुंबईतील काही आरोपींनी मिळून फिर्यादी मोगुलशाद बहना यांना गंडा घातला आहे. टाटा कंपनीतून 460 कोटी रुपये सीएसआर मिळत असून 400 कोटी त्यांना कॅश परत करायचे आहे, असं चोरट्यांनी व्यापाऱ्यास सांगितले. यामध्ये त्यांना मदत केल्यास उर्वरित 60 कोटी रुपये पैकी 30 कोटी रुपये देण्याचे आरोपींनी बहना यांना आश्वासन दिले होते.

पैसे उकळण्यासाठी या टोळक्याने मोठा प्लान रचला. सुरुवातीपासून त्यानी फिर्यादी व्यक्तीस वेगवेगळ्या ठिकाणी नेले आणि विविध व्यक्तींशी भेट करून दिली. असे करून तब्बल १ कोटी रुपये आरोपींनी उकळले. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत मुंबईतील आरोपी ॲलेक्स मिरांडा आणि त्याची पत्नी एंजल मिरांडा यांच्या विरोधात जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

नोकरीचं आश्वासन देत तरुणांना लाखोंचा गंडा

काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये देखील अशीच एक घटना घडली होती. मुंबई विमानतळावर चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे खोटे आश्वासन देऊन एका तरुणाचे लाखो रुपये लुटले होते. आरोपीला अटक करण्यात पोलिसांना आता यश आलं आहे. मुंबईच्या डी एन नगर पोलिसांनी आरोपीस अटक केलीये. विराज सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याने पर्फेक्ट कनेक्ट सोल्युशन या प्लेसमेंट कंपनीच्या माध्यमातून शेकडो बेरोजगार तरुणांची फसवणूक केल्याचे पुढील तपासाच उघड झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nana Patole: कुणी कुणाला धमकावला तर घरात घुसून मारू, नाना पटोले यांचा रोख कुणाकडं?

Sachin Sanghvi : प्रसिद्ध गायक सचिन सांघवीविरुद्ध गुन्हा दाखल; अत्याचार अन् गर्भपाताचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Railway Recruitment: १२वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! रेल्वेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, कारण अस्पष्ट

Maharashtra politics : ठाकरेंसह भाजपलाही धक्का, अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, भंडाऱ्याचे राजकारण फिरणार

SCROLL FOR NEXT