Nagpur Crime News Saam TV
क्राईम

Nagpur Crime News: कामाचे पैसे न दिल्याने मंजुरांचा संताप; शेतमालकाच्या कुटुंबातील अल्पवयीन मुलाला केलं किडनॅप

Crime News: शेतमजुरीचे पैसे न दिल्याच्या वादातून मालकाच्या मेहुणीच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू

Ruchika Jadhav

Nagpur:

नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतमालकाने मजुरीचे पैसे न दिल्याच्या रागातून एका १२ वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आले आहे. सालगडी म्हणून काम करत असलेल्या शेतमजूर दाम्पत्याने शेतमालकाच्या मेहुणीच्या १२ वर्षीय मुलाचे अपहरण केले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सालगडी दाम्पत्य गेल्या काही महिन्यांपासून शेतमजुरी करत आहेत. शेतमजुरी केल्यावर त्यांनी आपला मोबदला शेतमालकाकडे मागितला. मात्र मालकाने पैसे त्यांना पैसे म्हणजेच त्यांच्या कामाचा मोबदला देण्यास नकार दिला. पैसे न दिल्याने शेतमदुर दाम्पत्याला राग अनावर झाला. त्यामुळे त्यांनी चुकीचे पाऊल उचलले.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कळमेश्वर तालुक्यातील लोहारा येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी कळमेश्वर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरंग आर्य असं शेतमालकाचं नाव आहे. ते नागपूरचे असून लोणार येथे त्यांचे शेत आहे. तर सोनू आणि त्याची पत्नी गीता हे मागील ८ महिन्यांपासून श्रीरंग यांच्या शेतात काम करतायत. ते दोघेही मुळचे मध्यप्रदेश छिंदवाडा येथील आहेत. कामासाठी ते नागपूर येथे आलेत.

दिवाळी सण राज्यात प्रत्येक जण मोठ्या थाटामाटात साजरा करतो. शेतमजुर दाम्पत्याला देखील आपली दिवाळी आनंदात साजरी करायची होती. मात्र त्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. गेल्या आठ महिन्यांपासून शेतमालकाने त्यांचे रखडवलेले पैसे दिवाळीत त्यांच्या हातात येतील अशी त्यांना आशा होती. त्यामुळे दिवाळीत ते शेतमालकाकडे पैसे मागण्यासाठी गेले. मात्र पैसे न दिल्याने शेतमालक आणि मजूर दाम्पत्य यांच्यात भांडण झाले.

याच रागातून पुढे शेतमजूर दाम्पत्याने प्लॅन आखला आणि शेतमालकाच्या मेहुणीच्या १२ वर्षीय मुलाचे अपहरण केले. अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी ग्रामीण पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून अपहरण झालेल्या मुलाचा शोध सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ram-Leela Movie: रामलीला चित्रपटासाठी दीपिका पदुकोण नव्हती पहिली पसंती; तर या प्रसिद्ध अभिनेत्रीला  करण्यात आला होता रोल ऑफर...

Bajarang Sonawane : बीड जिल्ह्यात लोकसभेची पुनरावृत्ती निश्चित; खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला विश्वास

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

VIDEO : खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार कल्याणशेट्टी यांच्यात वाकयुद्ध | Marathi News

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

SCROLL FOR NEXT