Nagpur om Nagar Area Robbery  Saam TV
क्राईम

Nagpur Breaking News: नागपुरात व्यापाऱ्याच्या घरावर सिनेस्टाईल दरोडा; चाकूचा धाक दाखवत ८ लाख रुपये लुटले

Nagpur Crime News: नागपूर शहरातील ओमनगर परिसरात फुलांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याच्या घरावर शनिवारी (३ फेब्रुवारी) रात्री पाच ते सहा आरोपींनी दरोडा टाकला.

Satish Daud

Nagpur om Nagar Area Robbery

मागील काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. किरकोळ कारणावरून गोळीबारासारख्या गंभीर घटना घडत आहेत. दुसरीकडे झटपट पैसा कमवण्याचा नादात काहीजण चोरी तसेच दरोड्यासारख्या घटना घडवून आणत आहेत. असाच काहीचा प्रकार नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाणे परिसरात घडला. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ओमनगर परिसरात (Nagpur News Today) फुलांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याच्या घरावर शनिवारी (३ फेब्रुवारी) रात्री पाच ते सहा आरोपींनी दरोडा टाकला. चाकूचा तसेच खंजीरीचा धाक दाखवत आरोपींनी घरातील आठ लाखांची रोकड लंपास केली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे.

या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अमित दुरुगकर हे व्यापारी असून ते ओमनगर परिसरात आपल्या कुटुंबासहित राहतात. शनिवारी रात्री दुरुगकर कुटुंब झोपलेलं असताना दीड वाजेच्या सुमारास ५ ते ६ दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. (Latest Marathi News)

आरोपींनी सुरुवातीला घरातील वीज कनेक्शन बंद केले. त्यानंतर अंधाराचा फायदा घेत अमित दुरुगकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अमित यांनी आरडाओरड सुरू केली असता, आरोपींनी घरातील सदस्यांच्या गळ्यावर धारदार हत्यार ठेवून त्यांना शांत राहण्यास सांगितले.

यावेळी आरोपींनी घरात ठेवलेली ८ लाखांची रक्कम चोरून नेली. दरम्यान, घराच्या वरच्या मजल्यावर झोपलेल्या अमित दुरुगकरच्या भावाने खाली आरडाओरडा ऐकून लगेच पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घरात अज्ञात आरोपी शिरल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस हजर झाले. मात्र, तोपर्यंत आरोपींनी पळ काढला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये सतत भांडणं का होतात?

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

SCROLL FOR NEXT