Nagpur Crime News Saam tv
क्राईम

Nagpur News : खळबळजनक! नागपूरमध्ये आढळला एअर फोर्सच्या माजी कर्मचाऱ्यासह पत्नीचा मृतदेह

Nagpur Breaking News: नागपूर शहरातील सेमिनरी हिल्स परिसरातील एका घरामध्ये पती- पत्नीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा घातपात आहे की आत्महत्या? याबाबत आता पोलीस तपास सुरू आहे.

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर|ता. २० जून २०२४

नागपुरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूर शहरातील सेमिनरी हिल्स परिसरातील एका घरामध्ये पती- पत्नीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दीपक गजभिये आणि विद्या गजभिये अशी मृतदेह आढळलेल्या दांपत्याची नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूर शहरातील सेमिनरी हिल्स परिसरात एअर फोर्समध्ये काम करणारे कर्मचारी आणि पत्नीचा मृतदेह आढळून आला. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून घातपात की आत्महत्या याबाबतचा अधिक तपास आता सुरू आहे. दीपक गजभिये आणि विद्या गजभिये अशी मृत दांपत्यांची नावे आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, दिपक गयभिये हे एअरफोर्समधील कर्मचारी आहेत तर पत्नी विद्या या गृहिणी असल्याचे सांगण्यात येत आहे. काही वर्षांपासून विद्या गजभिये या अर्धांगवायूने त्रस्त होत्या. त्यांचा मुलगा आणि मुलगी कामानिमित्त बाहेर केले होते. ते परत आल्यानंतर आई- वडिल मृतावस्थेत आढळून आले.

मुलगा- मुलगी घराबाहेर गेल्यानंतर या दोघांनीही आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. याबाबतचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत भाजच्या ३ बड्या नेत्यांची हकालपट्टी, पक्षविरोधी काम केल्याचा ठपका

Crime: ६५ वर्षीय महिलेची हत्या, नंतर मृतदेहावर बलात्कार; २४ वर्षांच्या तरुणाचं हैवानी कृत्य

Bank Loan: कर्ज घ्यायचंय? तर कॅरेक्टर ठेवा चांगलं; सिबिलसह तपासलं जाणार तुमचा गुन्हेगारी रेकॉर्ड

Gold Rate Today: सोन्याच्या किंमतीत पुन्हा घसरण, आजचा भाव काय? वाचा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे ताजे दर

Gas Leak Safety: घरात गॅसचा वास येत असेल तर, 'या' ५ चुका करू नका, मोठा स्फोट होईल

SCROLL FOR NEXT