Railway News Saam Tv
क्राईम

Railway News :'प्रेग्नंट' घोटाळा उघड! ट्रेन तिकीट मिळवण्यासाठी महिलांची चलाखी, एका मोबाइल क्रमांकामुळं भंडाफोड

Railway News: रेल्वेतून रोज खूप लोक विनातिकीट प्रवास करतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Avantika Express News:

रेल्वेतून रोज खूप लोक विनातिकीट प्रवास करतात. अनेक जण आरक्षित तिकीटं मिळवण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवतात. असाच अजब प्रकार उघडकीस आला आहे. प्रेग्नंट असल्याची खोटी कागदपत्रे देऊन ज्येष्ठ नागरिकांच्या कोट्यातून आरक्षित तिकीटं मिळवणाऱ्या महिलांच्या टोळीचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पश्चिम रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांवर कारवाई करण्यात आली आहे. या महिलांनी गरोदर असल्याचं कारण देत बनावट कागदपत्रे तयार केली. त्या माध्यमातून त्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या कोट्यातून तिकीटे मिळवली. अवंतिका एक्स्प्रेससाठी ही तिकीटं आरक्षित करण्यात आली होती. हा प्रकार रेल्वे पोलिसांनी उघडकीस आणला असून, बनावट प्रमाणपत्रे तयार करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

पश्चिम रेल्वेचा चर्चगेट फ्लाइंग स्क्वॉड मुंबई सेंट्रल-इंदूर अवंतिका एक्स्प्रेसमध्ये (ट्रेन क्रमांक 12961) जागा उपलब्ध आहेत का याचा शोध घेत होते. यावेळी ज्येष्ठ नागरीक कोट्यातून ४० महिलांनी तिकीटे काढल्याचे समोर आले. या प्रकरणी पथकातील मुख्य तिकीट निरीक्षक अब्दुल अजीज आणि उपमुख्य तिकीट निरीक्षक मोहम्मद जाहीद कुरेशी यांच्या ही बाब निदर्शनास आली.

ही तिकीटे पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम (पीआरएस) द्वारे बुक केल्याचे आढळून आले. एकच मोबाइल नंबर टाकून ही सर्व तिकीटे बुक केल्याचेही समोर आले. या महिलांनी रीटर्न तिकीटे त्याच पद्धतीने बुक केली होती.

रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, वसई पीआरएसवर महिलांनी ज्येष्ठ नागरिक कोट्यातून तिकीटे बुक केली होती. या कोट्यात जागा उपलब्ध असल्याने त्यांनी ही तिकीटे बुक केली होती.

फ्लाइंग स्क्वॉडने दिलेल्या माहितीनुसार, पीआरएस काउंटरवर महिलांनी दिलेली प्रमाणपत्रे बनावट असल्याचे आढळून आले. ही बनावट प्रमाणपत्रे तयार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी हिरेंद्र घनश्याम कनाबर (वय ३६), विष्णू सोहलाल खटीक (वय २७) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सर्व तिकीटे ब्लॉक करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांची बारामतीमधून १५०० मतांनी आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT