train x
क्राईम

Crime : सूरतमध्ये अपहरण, मुंबईत हत्या अन् ट्रेनच्या टॉयलेटमध्ये मृतदेह... ५ वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूचं गूढ कसं उकललं?

Crime News : मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये एका ५ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळला. सूरत येथून त्याचे अपहरण झाल्याचे म्हटले जात आहे. मुलाच्या चुलत भावाने त्याची हत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Yash Shirke

  • सूरतमध्ये अपहरण झालेल्या ५ वर्षीय मुलाचा मृतदेह मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसच्या टॉयलेटमध्ये आढळला.

  • प्राथमिक तपासात मुलाची हत्या कौटुंबिक वादातून झाल्याची शक्यता असून चुलत भाव आरोपी आहे.

  • सुरत आणि रेल्वे पोलीस घटनास्थळी तपास सुरु करून सीसीटीव्ही फुटेज आणि मृत्यूचे नेमके कारण शोधत आहेत.

Shocking : मुंबई-कुशीनगर एक्स्प्रेस ट्रेनच्या टॉयलेटमध्ये ५ वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली. दोन दिवसांपूर्वी सुरतमध्ये मुलाच्या अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. सुरत पोलिसांचा तपास सुरु असताना ट्रेनमध्ये मुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २२५३७ क्रमांकाच्या ट्रेनच्या एसी कोच बी२ च्या टॉयलेटमध्ये मुलाचा मृतदेह आढळला. मुलाचे वय सुमारे ५ वर्ष असल्याचे म्हटले जात आहे. ट्रेनच्या एसी कोचच्या टॉयलेटमध्ये ठेवलेल्या कचऱ्याच्या डब्यात मुलाचा मृतदेह प्रवाशांना दिसला. प्रवाशांनी रेल्वे पोलीस आणि प्रशासनाला याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.

५ वर्षीय मुलाचा गळा चिरुन हत्या करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, मुलाचा २५ वर्षीय चुलत भाऊ हा या प्रकरणातील मारेकरी आहे. ही हत्या कौटुंबिक वादातून घडली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुरत पोलिसांसह रेल्वे पोलिसांनीही चुलत भावाचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. सीसीटीव्ही फुटेज शोधले जात आहे. सुरतहून हा मुलगा कसा पोहोचला? त्याची हत्या कशी झाली? हत्येचे नेमके कारण काय? याचा शोध पोलीस घेत आहेत.

'मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसच्या कोचमध्ये पहाटे १ वाजता मुलाचा मृतदेह आढळला. प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून मुलाची हत्या झाली आहे. मुलाची बेपत्ता असल्याची तक्रार दोन दिवसांपूर्वी सुरतमध्ये नोंदवण्यात आली होती, त्यानंतर सुरत पोलिसांनी मुलाचा शोध सुरु केला', अशी माहिती रेल्वे आयुक्त राकेश कला सागर यांनी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain : पैठण तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; २० गावांचा संपर्क तुटला

Maharashtra Live News Update: वणीत ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी आक्रमक; मोदी, शहांविरोधात घोषणाबाजी

Parbhani Rain: परभणीत मुसळधार पावसाचा तडाखा; जिंतूर तालुक्यात घरे व मंदिरे पाण्यात|VIDEO

Kidney Cancer: किडनी कॅन्सरच्या पहिल्या स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' बदल

Shocking: वर्गमित्रांचं भयंकर कृत्य! झोपलेल्या मित्रांच्या डोळ्यात टाकलं फेव्हिकॉल, ८ मुलांचे डोळे चिकटले

SCROLL FOR NEXT