Mumbai Crime  Saam Tv
क्राईम

Mumbai Crime: मुंबई हादरली! तरुणाकडून अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार, गर्भवती पीडितेने दिला बाळाला जन्म

Mumbai Police: मुंबईमध्ये तरुणाने आपल्या अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार केला. पीडिता गरोदर राहिली. तिने बहिणीला ही गोष्ट सांगितली खरी पण तिने आपल्या नवऱ्याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने बाळाला जन्म दिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

Priya More

अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना मुंबईतून समोर आली आहे. बहिणीच्या नवऱ्यानेच या मुलीसोबत हे भयंकर कृत्य केले. पीडित मुलीच्या बहिणीने आपल्या नवऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी एका ४० वर्षीय तरुणाला अटक केली. तर गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणि अल्पवयीन मुलीची घरीच प्रसूतीत मदत केल्या प्रकरणी पीडित मुलीच्या बहिणीला म्हणजेच आरोपीचा बायकोला देखील पोलिसांनी अटक केली. मुलीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा भयंकर प्रकरण उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी तिची मोठी बहिणी आणि तिच्या नवऱ्यासोबत एकाच घरात राहत होती. या अल्पवयीन मुलीने आरोप केला आहे की, तिच्या मेहुण्याने मार्च २०२४ ते जुलै २०२५ दरम्यान तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला होता. जेव्हा तिने तिच्या मोठ्या बहिणीला गरोदरपणाबद्दल सांगितले तेव्हा तिने तिला धमकावले आणि कुणाकडेच मदत मागू दिली नाही.

नवऱ्याचा गुन्हा लपवण्यासाठी पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीने अल्पवयीन मुलीला डॉक्टरकडे जाऊ दिले नाही. तसंच कोणत्याही वैद्यकीय उपचारांसाठी बाहेर जाऊ दिले नाही. तिने घरीच पीडित मुलीची प्रसूती केली. पण जेव्हा मुलीची प्रकृती बिघडली तेव्हा तिला भाभा रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी घटनेची माहिती पोलिसांनी दिली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, 'अल्पवयीन मुलीची प्रकृती स्थिर झाल्यानंतर आम्ही तिचा जबाब नोंदवला. तिच्या जबाबाच्या आधारे, आम्ही तिच्या मेहुण्यावर आणि तिच्या मोठ्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल केला. नंतर दोघांनाही अटक करण्यात आली. पीडिता आणि तिच्या बाळाला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे.

वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी बलात्कार आणि धमक्या दिल्याबद्दल बाल लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा म्हणजेच पोक्सो अंतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर मुख्य आरोपीला अटक केली. पोलिसांनी पीडितेच्या मोठ्या बहिणीवर गुन्ह्याची माहिती लपविण्याचा, पुरावे गायब करण्यास कारणीभूत ठरण्याचा आणि अल्पवयीन मुलीला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर तिलाही अटक करण्यात आली. पीडितेने रुग्णालयात बाळाला जन्म दिला आणि सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Weather Update: IMDच्या नव्या अंदाजानं शेतकऱ्यांची चिंता वाढवली; महाराष्ट्रात दोन आठवडे पावसाची दांडी

Plane Crash: अमेरिकेत आणखी एक दुर्घटना; समुद्रात कोसळले विमान

Tuesday Horoscope : वाईट संकटांचा सामना करावा लागेल, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Milk Mithai: दूधापासून घरीच बनवा 'या' टेस्टी मिठाई

Pune News: पुण्यात पोलिसांची दलित मुलींवर खोलीत घुसून मारहाण; कायद्याचे धिंडवडे

SCROLL FOR NEXT