Manasvi Choudhary
बोधगया हे बिहारमधील गया जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. बोधीवृक्षाखाली या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली.
गंगा नदीच्या दक्षिणेकडील तीरावर पटना शहर वसलेले आहे. जे इ.स. पूर्व ५ व्या शतकातील अनेक साम्राज्यांची राजधानी होते. ऑक्टोबर ते मार्च दरम्यान येथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
प्राचीन काळातील सर्वात लोकप्रिय नालंदा हे ठिकाण आहे. अध्यात्म आणि इतिहास संस्कृतीचा वारसा येथे पाहायला मिळतो.
बिहारमधील एक छोटा जिल्हा वैशाली हे ठिकाण आहे. हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मांचे लोक या ठिकाणी राहतात. वैशाली येथे भगवान महावीरांचा जन्म झाला होता.
बिहारमधील सीतामढी हे शहर भगवान राम यांच्या पत्नी देवी सीतेचे जन्मस्थान आहे. पुनौरा धाम या ठिकाणी मातीच्या भांड्यात माता सीतेचा उगम झाला होता.
पावपुरी हे जैन धर्मीयांसाठी पवित्र ठिकाण आहे.नालंदा हे पूर्व भारतातील बिहार राज्यातील नालंदा जिल्ह्यात वसलेले ठिकाण आहे.
भागलपूर हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर गंगा नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले आहे. भागलपूर, ज्याला रेशीम शहर म्हणूनही ओळखले जाते, ते बिहारमधील तिसरे सर्वात मोठे शहर आहे.
बिहारमधील मधुबनी हे एक प्राचीन शहर आहे जे जिल्ह्याला कला आणि संस्कृतीच्या समृद्धतेसाठी ओळखले जाते.
राजगीर हे असे शहर आहे जिथे त्याच्या सुंदर दृश्यांभोवतीची हवा आध्यात्मिकतेचे संकेत आणि बौद्ध आणि जैन धर्माशी जोडलेल्या इतिहासाच्या जिवंत रंगछटांसह येते.
आरा हे बिहारच्या भोजपुरी जिल्ह्यातील शहर आहे. पटनापासून ४० किमी अंतरावर हे ठिकाण आहे. गंगा आणि सोन या दोन नंद्यानी वेढले आहे.