Rashmika Mandanna: रश्मिका मंदान्नाने परिधान केली सुंंदर सॅटिन साडी, पाहा फोटो

Shruti Vilas Kadam

साडीचा ग्लॅमरस लूक

रश्मिका मंदान्नाने रेड कार्पेटवर साडी परिधान करून दाखवले की साडी कोणत्याही गाऊनपेक्षा अधिक एलिगंट आणि ग्लॅमरस दिसू शकते.

Rashmika Mandanna

शॅम्पेन सॅटिन साडी

तिने शॅम्पेन रंगाची सॅटिन साडी परिधान केली होती. साडीच्या चमकदार टेक्स्चरने तिचा लूक खुलून दिसला.

Rashmika Mandanna

सिक्विन बॉर्डरची झळाळ

साडीच्या बॉर्डरवर हलक्या सिक्विन वर्कमुळे सौम्य झळाळ आणि सॉफ्ट ग्लिटरिंग इफेक्ट दिसत होता, यामुळे संपूर्ण लूक अधिक आकर्षक वाटला.

Rashmika Mandanna

हॉल्टर नेक ब्लाउजचा मॉडर्न टच

तिने हॉल्टर नेक आणि डीप प्लंजिंग नेकलाइन असलेला ब्लाउज घातला होता. जो पारंपरिक साडीला एक आधुनिक आणि बोल्ड टच देत होता.

Rashmika Mandanna

मिनिमल मेकअप आणि ज्वेलरी

रश्मिका मंदान्नाने भारी दागिने टाळले. तिने फक्त साधे इयररिंग्स आणि रिंग्ज घातल्या. न्यूड लिप्स, स्मोकी आयज आणि सॉफ्ट ब्रॉन्झ टोन मेकअपमुळे तिचा नैसर्गिक लूक उठून दिसला.

Rashmika Mandanna

वेव्ही हेअरस्टाईलची शोभा

तिने साइड-स्विप्ट वेव्ही हेअरस्टाईल ठेवली होती, यामुळे तिच्या चेहऱ्याचा ग्रेस अधिक खुलून आले.

Rashmika Mandanna

साडी लूकसह पुरस्कारही जिंकला

फॅशननेच नव्हे तर रश्मिकाने त्या इव्हेंटमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही जिंकला. तिचा साडी लूक आणि आत्मविश्वास दोन्ही चाहत्यांच्या मनावर छाप सोडून गेले.

Rashmika Mandanna

Hair Care: केसांना आळशीचा मास्क लावल्याने काय फायदे आहेत? कसा वापरावा हा मास्क

Hair Care | Saam Tv
येथे क्लिक करा