Kalyan Crime News Saamtv
क्राईम

Kalyan Crime: युवकासोबत लॉजवर आली, दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह; कल्याणमधील घटनेने खळबळ; महिलेसोबत काय घडलं?

Kalyan Crime News: शहरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाला दहा दिवस उलटत नाही तोच कल्याण स्टेशन परिसरातील एका लॉजमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Gangappa Pujari

अभिजीत देशमुख, कल्याण|ता. १० डिसेंबर २०२३

Kalyan Crime News:

शहरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाला दहा दिवस उलटत नाही तोच कल्याण स्टेशन परिसरातील एका लॉजमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ज्योती तोरडमल असे या मृत महिलेचे नाव असून ती शनिवारी (९, डिसेंबर) एका व्यक्तीसोबत लॉजमध्ये आली होती. या महिलेची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Crime News in Marathi)

कल्याण स्टेशन परिसरात (Kalyan) असलेल्या लॉजच्या एका रूममध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ज्योती तोरडमल असा या महिलेचे नाव असून ती घाटकोपर येथे राहत होती. ज्योती तोरडमल ही भूपेंद्र गिरी नावाच्या एका इसमासोबत काल (शनिवार, ९ डिसेंबर) दुपारच्या सुमारास या लॉजवर आली होती.

आज (रविवार,९ डिसेंबर) सकाळी बराच वेळ झाला मात्र दरवाजा उघडत नसल्याने लॉजमधील कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला तेव्हा या महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तात्काळ महात्मा फुले पोलिसांना याबाबत माहिती दिली. महात्मा फुले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. ज्योतीच्या सोबत आलेला भूपेंद्र गिरी हा पसार झाला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, ज्योतीची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे .महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील,पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली फरार युवकाच्या शोधासाठी पोलिसांचे दोन पथके रवाना झालेत. भूपेंद्र ताब्यात आल्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात 2 पूरबळी; यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपलं

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT