Crime News Yandex
क्राईम

Crime News: भयंकर! हॉटेलमध्ये महिलेचा मृत्यू, 5 दिवस कुटुंब मृतदेहाजवळ बसून, नक्की काय आहे प्रकरण?

Latest Crime News Woman Death: नवी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. हॉटेलमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. नातेवाईक पाच दिवस त्या मृतदेहाजवळ बसून होते.

Rohini Gudaghe

Mumbai Crime News

साकीनाका पोलीसांना (Sakinaka Police) एका 48 वर्षीय महिलेचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत सापडला आहे. या महिलेच्या मृत्यूला पाच दिवसांपेक्षा जास्त काळ झाल्याची माहिती मिळतेय. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, तिचं कुटुंबीय मृतदेहाजवळ बसून होते. महिलेचा मुलगा यूकेहून परतल्यावर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. नक्की काय घटना घडली, ते आपण सविस्तर पाहू या. (Latest Crime News)

एका ४८ वर्षीय महिलेचा मृतदेह ( Woman Death In Hotel) हॉटेलच्या खोलीत पाच दिवसांपेक्षा जास्त काळ होता. तिच्या कुटुंबातील चार सदस्य देखील याच खोलीत मृतदेहासोबत होते. या मृत्यू प्रकरणाचा तपास साकीनाका पोलीस करत आहेत. युकेमध्ये काम करणाऱ्या महिलेचा मुलगा शनिवारी परतला. त्याने पोलिसांना कळवलं, तेव्हा हे मृत्यू प्रकरण उघडकीस आलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय आहे प्रकरण

मृत महिलेचं नाव नसीमा हलाई आहे. तिचे वडील अब्दुल करीम हलाई (८२), तिची २६ वर्षीय मुलगी, तिचा भाऊ आणि पुतण्या हे सगळेजण हॉटेलच्या रूममध्ये (Mumbai Crime) होते. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नसीमा आजारी होती. आजारपणाने तिचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर तिच्या पुतण्यानं यूकेमध्ये असलेल्या नसीमाच्या मुलाला ईमेल पाठवला होता.

या महिलेचा पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे, अशी माहिती साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गबाजी चिमटे यांनी दिली (Woman Dies In Hotel Room) आहे. आमच्या टीमने हॉटेलच्या खोलीत जाऊन मृतदेह बाहेर काढला, तो जवळजवळ कुजलेला होता. आम्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला आहे. अपघाती मृत्यूची नोंद केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

पोलीस काय म्हणतात

नसीमा पतीसोबत भांडण झाल्यानंतर मुलीसह घरातून निघून गेली होती. घरातून बाहेर पडल्यानंतर नसीमा, तिचे वडील, मुलगी, भाऊ आणि पुतण्या वेगवेगळ्या हॉटेलमध्ये थांबले होते. उदरनिर्वाहासाठी नसीमा शिकवणी घ्यायची. नसीमाची मुलगीही अशक्त झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, असं पोलिसांनी सांगितले.

जेव्हा आम्ही हॉटेलच्या खोलीत पोहोचलो, तेव्हा दुर्गंधी येत होती. आम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांचे जबाब नोंदवले (Crime News) आहेत. यात काहीही संशयास्पद आढळलं नाही, असं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. खोलीत कोणत्याही हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांना परवानगी नव्हती. पोलिसांनी सांगितलं की, मृत महिलेचं कुटुंब यूकेमधून तिचा मुलगा येण्याची वाट पाहत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT