Mumbai Crime News Wife dies as husband kicks her in stomach during fight FIR filed against him  Saam Tv
क्राईम

Mumbai Crime News: किरकोळ कारणावरून जोडप्यात वाजलं; वादातून पतीनं पत्नीच्या पोटात लाथ मारली अन्... होत्याचं नव्हतं झालं

Mumbai Crime News: वर्सोवा येथे पतीसोबत झालेल्या भांडणात महिलेच्या पोटात लाथ मारल्याने तिचा मृत्यू झाला. आतड्यांना गंभीर दुखापत झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले.

Shruti Vilas Kadam

Mumbai Crime News: मुंबईतील वर्सोवा परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीसोबत झालेल्या भांडणादरम्यान पोटात लाथ मारल्याने ४२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पतीविरुद्ध ‘खुनाच्या उद्देशाशिवाय केलेला मनुष्यवध’ अर्थात (culpable homicide not amounting to murder) या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

मृत महिलेचे नाव रुक्साना शेख असे असून ती तिचा पती शहनुद्दीन आणि दोन मुलींसोबत वर्सोवा परिसरात राहत होती. पोलिसांच्या माहितीनुसार, रुक्सानाला लो बीपीचा त्रास होता. १८ मे रोजी पहाटे तिने तिची बहीण रिया हिला फोन करून पतीने तिच्यासोबत भांडण करत पोटात लाथ मारल्याचे सांगितले. त्यानंतर तिला पोटदुखी सुरू झाली होती.

रियाने तातडीने दुसरी बहीण झाराला संपर्क केला. झाराने रुक्सानाला कूपर रुग्णालय येथे दाखल केले. तेथे एक्स-रे आणि सोनोग्राफी करण्यात आली. मात्र सुरुवातीला कोणतीही गंभीर दुखापत दिसून आली नाही. उपचारानंतर रुक्साना घरी परतली. मात्र तिची प्रकृती सतत खालावत गेली आणि पोटदुखी अधिक वाढू लागली.

यानंतर कुटुंबीयांनी तिला अंधेरीतील सेव्हन बंगलो परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे पुन्हा सोनोग्राफी करण्यात आली. तरीही तिची प्रकृती सुधारली नाही. अखेर तिला तिसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिल्यानंतर तिला आणखी एका रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिचा पतीदेखील उपस्थित होता.

सीटी स्कॅनचा अहवाल पाहिल्यानंतर डॉक्टरांनी तिच्या शरीरात इन्फेक्शन पसरल्याचे सांगितले. कौटुंबिक डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुक्सानाला पुन्हा कूपर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. तेथे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली; मात्र शस्त्रक्रियेनंतर तिला शुद्ध आली नाही. २० मे रोजी डॉक्टरांनी रुक्सानाला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात तिच्या आतड्यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी २२ मे रोजी पोलिसांनी शहनुद्दीनविरुद्ध एफआयआर दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vinchu Home Remedies : घरात विंचू येण्याने त्रस्त आहात? हे ४ उपाय करतील कायमचा बंदोबस्त

मंत्रिमंडळात फेरफार की नेतृत्वबदल? मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री दोघांना दिल्लीचा निरोप, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरण; पुण्यातील आणखी प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर?

Saree Storage Tips: पैठणी ते साधी साडी; पाहा साडीची घडी नक्की कशी घालायची, साड्या घडीवर कधीच नाही फाटणार

जम्मू-काश्मीरमध्ये रोपवे हवेत अचानक बंद, ३०० पर्यटक अडकले; रेस्क्यू ऑपरेशन जारी

SCROLL FOR NEXT