Fake Website To Sell IPL Tickets Saam Tv
क्राईम

Crime News: IPL तिकीटं विकण्यासाठी बोगस वेबसाइट, सूरत कनेक्शन; सौदी अरेबियात पोर्टलचं डिझाइन, हाँगकाँगमध्ये सर्व्हर

Fake Website To Sell IPL Tickets: सध्या आयपीएलचा हंगाम सुरू आहे. त्यामुळं याचा फायदा घेत IPL तिकीटं विकण्यासाठी बोगस वेबसाइट केल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

Rohini Gudaghe

Mumbai Crime News

मुंबई (Mumbai) गुन्हे शाखेचे गुन्हे इंटेलिजन्स युनिट आणि दक्षिण सायबर पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. त्यांनी कथितपणे 'बुक माय शो डॉट कॉम'सारखी बनावट वेबसाइट तयार करून बनावट तिकीटे विकण्यास सुरूवात (Fake Website To Sell IPL Tickets) केली होती. सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व 10 फ्रँचायझी संघांसाठी बनावट तिकिटे विकण्यास सुरुवात केली होती.

(Latest Crime News)

'बुक माय शो डॉट कॉम' मुंबई इंडियन्स आणि इतर तीन आयपीएल संघांसाठी अधिकृत ऑनलाइन तिकीट विक्रेता आहे. या प्रकरणाचं सूरत कनेक्शन उघडकीस आलं आहे. पोलिसांना तपासादरम्यान आढळून आलंय की, हे बनावट पोर्टल सौदी अरेबियातील एका आरोपीने डिझाइन केलं होतं. त्याचं सर्व्हर हाँगकाँगमध्ये (Crime News) होता. यानंतर पोलिसांनी पेमेंट गेटवेचा तपास सुरू केला. तेव्हा त्यांना पेमेंट स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सुरत येथील कामरेज शाखेत 'एके एंटरप्रायझेस'च्या खात्यात जमा झाल्याचं आढळलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बुक माय शो डॉट कॉम'च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने लेखी अर्ज करून याबाबत तक्रार दाखल केली होती. 29 मार्च रोजी दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी आयपीएल 2024 च्या सामन्यांची बनावट तिकिटे बनवली (IPL Tickets) होती. ती तिकिटे खरी असल्याचा दावा करून त्यांची ऑनलाइन विक्री देखील त्यांनी केली.

पोलीस पथकाने एके एंटरप्रायझेसच्या मालकाची ओळख पटवली. त्यांनी सुरतला जाऊन त्याला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने कबूल केलं की, त्याने त्याचं बँक खातं एका व्यक्तीला दिलं (Fake Website) होतं. या ऑपरेशनसाठी त्याला ५० हजार रूपये दिली गेल्याची कबूली त्याने पोलीस चौकशीत दिली आहे.

खुशाल रमेशभाई डोबरिया (24), भार्गव किशोरभाई बोर्ड (22), वेब डेव्हलपर उत्तम मनसुखभाई भिमानी (21), मोबाइल ॲप डेव्हलपर जस्मिन गिरधरभाई पिठाणी (22), हिम्मत रमेशभाई अंताला (35), निकुंज भूपतभाई खिमानी आणि अरविंदभाई (27) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे (Crime News) आहेत. सर्व आरोपी सुरतचे रहिवासी आहेत. त्यांना 31 मार्च रोजी मुंबईत आणण्यात आलं. त्यांना न्यायालयाने 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तपासादरम्यान असं आढळून आलं की, बोर्ड आणि पिठाणी यांनी डोबरिया आणि इतर आरोपींना मदत केली होती. त्यांना बँक खाते आणि खात्याशी जोडलेला मोबाइल नंबर दिला (Mumbai Crime News) होता. भिमानी यांनी वेबपेज डेव्हलप केलं होतं. खिमानी आणि चोटालिया यांनी एटीएममधून पैसे काढले. अंटालाला चोटालियाकडून पैसे मिळाले होते. डोबरियाने पैसे बँक खात्यात जमा केले होते. ते रोख स्वरूपात काढण्यात आले होते, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pushpa 2 : The Rule Trailer : ''पुष्पा, फायर नहीं, वाइल्ड फायर है..'', पुष्पा 2 : द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Health Tips: झोपण्यापूर्वी गूळ खाण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

China: तुम्हाला माहिती आहे का? चीनमध्ये मुलांना 'या' अनोख्या गोष्टी शिकवल्या जातात

Viral Video: नजर हटी दुर्घटना घटी! बोटीवर चालता चालता तरुणाचा गेला तोल अन्...पाहा पुढे नेमकं काय घडलं

CM Shinde: मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, पण...,CM पदाबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT