Mumbai security guard arrested in minor assault case 
क्राईम

मुंबई हादरली! सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार

7-Year-Old Girl Physical Abused: मुंबईच्या पायधुनी भागात एका सात वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.

Bharat Jadhav

  • ७ वर्षीय मुलीवरील अत्याचाराची धक्कादायक घटना उघडकीस आली .

  • गोदामातील सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे.

  • पायधुनी पोलीस प्रकरणाचा तपास करत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

संजय गडदे, साम प्रतिनिधी

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला पुन्हा एकदा एका नराधमाच्या कृत्याने काळीमा फासला आहे. दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात अवघ्या ७ वर्षांच्या निष्पाप मुलीवर एका गोदामाच्या सुरक्षा रक्षकाने (वॉचमन) लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना रविवारी दुपारी घडली.

या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण पायधुनी परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, संतप्त नागरिकांनी आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी पायधुनी पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि रस्त्यावर उतरून जोरदार 'रास्ता रोको' आंदोलन केले. याप्रकरणी 32 वर्षीय आरोपीला पायधुणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पीडित चिमुरडी दुपारी खेळण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र, दुपारचे अडीच वाजून गेले तरी ती घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या आईने आणि शेजाऱ्यांनी परिसरात तिची शोधशोध सुरू केली. शोध घेत असताना, कुर्ला स्ट्रीट, दिल्ली स्टँड परिसरातील एका गोदामाच्या (गोडाऊन) पोटमाळ्यावर ही ७ वर्षांची मुलगी गंभीर आणि रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली. मुलीची ही अवस्था पाहून शोध घेणाऱ्या नागरिकांनी एकच आरडाओरडा केला.

गोदामात मुलीसोबत घडलेला प्रकार पाहून शेजारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. संतापलेल्या जमावाने घटनास्थळीच असलेल्या नराधम सुरक्षा रक्षकाला पकडून चांगलाच बेदम चोप दिला आणि त्यानंतर त्याला पायधुनी पोलिसांच्या स्वाधीन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिग बॉस मराठी फेमच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल; डॉक्टरांना घरात घुसून मारहाण अन्...; नेमकं प्रकरण काय?

620 पैकी 150 अधिकारी अजूनही मंत्र्यांच्या दालनात; 30 अधिकाऱ्यांचा शिंदेंचं कार्यालय सोडण्यास नकार?

AI च्या गैरवापरानं 100 कोटी मृत्यू; बिल गेट्स यांचा खळबळजनक दावा

Mulund land case : मोठी बातमी! मुलुंड जमीन गैरव्यवहारप्रकरणी महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

पप्पा आत्महत्या करतील म्हणून मी त्यांच्या मागे जातो; धाराशिवच्या शेतकरी पुत्राची व्यथा ऐकून महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT