Mumbai Crime News Saam TV
क्राईम

Mumbai Crime News: राष्ट्रवादीचा पदाधिकारी, गुरुजी बनून करायचा फसवणूक; अयोध्येला जाण्यापूर्वीच पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Crime News: राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलेल्या ऋषी पांडे याने गुरुजी असल्याचा बनाव केला. तसेच तुम्हाला मदत करतो असे सांगून अनेकांकडून लाखो रुपये उकळले. याप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Ruchika Jadhav

संजय गडदे

Mumbai:

मुंबईच्या चारकोप परिसरात राहणारा राष्ट्रवादीचा पदाधिकारी गुरुजी उर्फ ऋषि पांडे याला फसवणूक प्रकरणी बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलेल्या ऋषी पांडे याने गुरुजी असल्याचा बनाव केला. तसेच तुम्हाला मदत करतो असे सांगून अनेकांकडून लाखो रुपये उकळले. याप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

आरोपीच्या मागावर असलेल्या पोलिसांना गुंगारा देत आरोपी ऋषी पांडे हा मथुरा, गुजरात सोमनाथ उज्जैन अशा विविध मंदिरात जाऊन देवदर्शन करून अयोध्येला जाण्याच्या तयारीत होता. तो अयोध्येला जाण्याआधीच बोरिवली पोलिसांनी आरोपीला गुजरात येथून अटक केली आहे. आरोपी सध्या बोरिवली पोलिसांच्या ताब्यात असून त्याने कुणाकुणाची फसवणूक केली यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरिवली परिसरात राहणाऱ्या एका महिलेने फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती यानंतर या फेसबुक पोस्टवरून मोठा वादही निर्माण झाला होता. प्रकरण बोरिवली पोलीस ठाण्यात गेले. दरम्यानच्या काळात महिलेची ओळख गुरुजी उर्फ ऋषी पांडे सोबत झाली. ऋषी पांडे याने माझी पोलिसांसोबत ओळख असून प्रकरण दडपून टाकण्यासाठी महिलेकडून पोलिसांच्या नावावर चेक द्वारे लाखो रुपये घेतले. मात्र या प्रकरणात ऋषी पांडेकडून महिलेला कोणतीही मदत झाली नाही.

याबाबत महिलेने ऋषी पांडेकडे पैसे मागण्यासाठी तगादा लावला असता पांडेने महिलेचे फोन घेणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या ध्यानात येताच तिने गुरुजी उर्फ ऋषी पांडे विरोधात तक्रार दिली. बोरिवली पोलिसांनी आरोपी विरोधात कलम 420 अन्वये गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी एपीआय बापू घोडके व पीएसआय कल्याण पाटील यांच्या तपास आरोपीचा माग घेण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आरोपी गुरुजी उर्फ ऋषी पांडे पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आपला मोबाईल नंबर बदलून उत्तर भारतात देव दर्शनासाठी फिरू लागला. आरोपीने मध्य प्रदेश, उज्जैन, गुजरात सोरटी, सोमनाथ या ठिकाणच्या धार्मिक स्थळांना भेटी दिल्या आणि अयोध्येला जाण्यापूर्वीच बोरवली पोलिसांनी त्याला गुजरात सुरत येथून अटक केली आहे.

बोरिवली पोलिसांनी आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. बोरिवली पोलीस आरोपीने अजून कुणाकुणाची फसवणूक केली आहे का या संदर्भात अधिकचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या मनात काय? आगामी निवडणुकीआधी CM देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं भाष्य

SCROLL FOR NEXT