Crime News SaamTv
क्राईम

Mumbai Crime News: मुंबई शहर अंमली पदार्थ तस्करांच्या विळख्यात? बोलिव्हियन महिलांची हुशारी पोलिसांनी ओळखली, ८० कोटींचा माल जप्त

Mumbai Crime News: पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केलंय.

Vishal Gangurde

सचिन गाड

Mumbai Crime News:

मुंबईसह राज्यातील विविध शहरात ड्रग्ज तस्करांच्या विरोधात मोठी कारवाई सुरू आहे. पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केलंय. अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने पुन्हा एकदा मुंबईत आंतरराष्ट्रीय टोळीतील तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांनी तस्करांकडून तब्बल ८० कोटींचा माल जप्त केला आहे. (Latest Marathi News)

मुंबईत अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने तब्बल ८० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने ३० कोटी रुपयांचे कोकेन आणि ५० कोटी रुपयांचे अल्प्राझोलम जप्त केले आहेत.

तीन वेगवेगळ्या गुन्ह्यात कोट्यावधी रूपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात एक नायजेरियन, २ बोलिव्हियन महिलांसह एकूण ९ लोकांना अटक केली आहे. बोलिव्हियन महिलांनी मेकअप, टुथ पेस्ट आणि साबणातून अंमली पदार्थाची तस्करी केल्याचे उघड झाले आहे.

अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने अल्प्राझोलमचे दोन कारखाने सील केले आहेत. त्यांनी तब्बल २०० किलो अल्प्राझोलम जप्त केले आहेत.

सॅनिटरी पॅडमधून अंमली पदार्थाची तस्करी

मुंबई विमानतळावरही डीआरआयने तस्करांवर मोठी कारवाई केली. डीआरआयने कारवाई करत छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावरून ५६८ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केले आहे. या प्रकरणात डीआरयने युगांडा आणि टांझानिया देशाच्या महिलांना अटक केली आहे. दोन्ही महिला सॅनिटरी पॅड आणि गुद्वारातून कोकेनची तस्करी केल्या प्रकरणी अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT