HSC Student End Life Yandex
क्राईम

Shocking: धक्कादायक! मित्रांनीच दारू पाजत मारहाण केली, निर्वस्त्र करून व्हिडिओ काढला; १२वीच्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन

HSC Student End Life: मुंबईतील मुरबाडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बारावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे, त्याच्या आत्महत्येचं धक्कादायक कारण समोर आलं आहे.

Rohini Gudaghe

Mumbai Crime HSC Student Assulted By Senior

मुरबाडमधील एका 17 वर्षीय बारावीच्या विद्यार्थ्याने ( HSC Student) आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुरबाडमधील स्थानिक महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्याने विहिरीत उडी मारून स्वत:चं जीवन संपवलं आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्याच्या आत्महत्येचं धक्कादायक कारण समोर आलं आहे. (Latest Crime News)

या मुलाला त्याच्या सहा महाविद्यालयीन मित्रांनी मारहाण केली होती. नग्न अवस्थेत मारहाण करून त्याचा व्हिडिओ शूट केला होता. या प्रकारामुळे निराश होऊन या पीडित विद्यार्थ्याने टोकाचा निर्णय घेतला, अन् जीवन संपवलं. याप्रकरणी मुरबाड पोलिसांनी पाच विद्यार्थ्यांना अटक केली ( HSC Student End Life) आहे, तर एक विद्यार्थी फरार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नक्की काय घडलं?

मुरबाडमधील खोपोली गावातील हा विद्यार्थी होता. त्याने या घटनेची माहिती देणारी चिठ्ठी लिहिली होती, ती सापडली आहे. त्यानंतर हे प्रकरण उघड झालं (Mumbai Crime) आहे. 21 फेब्रुवारी रोजी पीडित विद्यार्थ्याने बारावीच्या बोर्ड परीक्षेचा इंग्रजी विषयाचा पहिला पेपर दिला होता. त्यानंतर ही घटना घडली होती. पीडित विद्यार्थी त्याच्या अभ्यासू स्वभावासाठी ओळखला जात होता. परंतु 21 फेब्रुवारीला तो त्याच्या कॉलेजच्या वरिष्ठांकडून रॅगिंगचा निशाणा बनला.

21 फेब्रुवारी रोजी पीडित विद्यार्थी पेपर संपवून घरी परतत होता. त्यानंतर त्याच्या काही वरिष्ठ मित्रांनी त्याला थांबवलं. त्यांच्यासोबत जाण्यास भाग पाडलं होतं. ते त्याला मुरबाड येथील एका फार्महाऊसवर घेऊन (HSC Student Assulted By Senior) गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी दारू पिऊन या मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली. जबरदस्तीने त्यांच्यासोबत दारू पिण्यास भाग पाडलं.

चिठ्ठी सापडली

पीडित विद्यार्थ्याने नकार दिल्यावर सर्वांनी त्याला जबरदस्तीने विवस्त्र केलं. त्याचा नग्न अवस्थेत व्हिडिओ ( Naked Video) काढला. त्यानंतर त्याला घरी पाठवलं. तो रात्री उशिरा घरी परत आला, पण त्याने त्याच्या कुटुंबाला काहीही सांगितले नाही. 23 फेब्रुवारी रोजी पीडित मुलगा बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेत असताना त्याचा मृतदेह गावातील विहिरीत आढळून आला.

रविवारी रात्रीपर्यंत कुटुंबीयांना त्याचे कारण माहीत नव्हते. त्याच्या एका नातेवाईकाने त्याचा फोन सुरू केला. तेव्हा फोनमध्ये त्यांना या घटनेचा उल्लेख असलेली चिठ्ठी सापडली होती. त्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आणि पॉक्सो कायद्याच्या तरतुदींखाली आयपीसी कलमांतर्गत एफआयआर दाखल केला (Crime News) आहे. त्यानंतर पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी या मुलांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत खळबळ! हायप्रोफाईल एरियात मॉडेलच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

IND T20 WC 2026: शनिवारी टी-२० वर्ल्डकपचा थरार! टीम इंडिया कोणासोबत करणार दोन हात, १५ शिलेदार कोणते, A टू Z माहिती एका क्लिकवर

Mumbai News: IIT बॉम्बेमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या, हॉस्टेलच्या इमारतीवरून मारली उडी

Video Viral: रिलसाठी काहीपण!!! धावत्या लोकलमध्ये लटकत तरूणीचा स्टंट, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT