Mumbai Crime News Saam Digital
क्राईम

Thane Crime News: धक्कादायक! बदला घेण्यासाठी मेहुणीच्या १८ महिन्यांच्या मुलाचे अपहरण

Thane Crime News: महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बदला घेण्यासाठी एकाने चक्क मेहुणीच्या १८ महिन्यांच्या बाळाचे अपहरण केले आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Thane Crime News

महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बदला घेण्यासाठी एकाने चक्क मेहुणीच्या १८ महिन्यांच्या बाळाचे अपहरण केले आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने पोलिसात तक्रार दिली असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. एका पोलीस अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.

कौटुंबिक वाद सुरू असल्यामुळे तक्रारदार महिलेची बहीण काही दिवसांपासून आपला पती सरवर अलीपासून वेगळी राहात आहे. अलीकडेच अलीने तक्रादार महिलेशी संपर्क करून आपल्या पत्नीचा पत्ता विचारला होता. मात्र त्या महिलेने आपल्या बहिणीची कोणतीही माहिती त्याला दिली नाही. त्यानंतर तो निघून गेला होता.

दरम्यान बुधवारी अली आणि त्याचा अन्य एक सहकारी सदर महिलेच्या कळवा येथील घरी आले होते. त्यांनी बदला घेण्यासाठी तक्रादार महिलेच्या मुलाचे अपहरण केले. दरम्यान या महिलेने याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा कळवा पोलिसांकडून तपास सुरू आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT