Kurar Crime News: Saamtv
क्राईम

Mumbai Crime: छेडछाडीची तक्रार दिल्याचा राग... महिला शिक्षिकेवर रॉडने प्राणघातक हल्ला; कुरारमधील धक्कादायक घटना

Crime News: पीडित तरुणीने काही महिन्यांपूर्वी आरोपीविरुद्ध छेडछाडीचा गुन्हा दाखल केला होता. त्यात तो तुरुंगातही होता. याचाच राग धरून तरुणाने तरुणीवर हल्ला केला.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Kurar Crime News:

मुंबई कुरारमध्ये एका महिला शिक्षिकेवर रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये महिला शिक्षिका गंभीर जखमी झाली असून सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कुरारच्या संजय नगरमध्ये आज सकाळी (३०, मार्च) एका स्थानिक गुंडाने संगणकाचे वर्ग चालवणाऱ्या महिला शिक्षकावर रॉडने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर मुंबईच्या कांदिवली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मोहम्मद हारून इद्रीशी (२२) उर्फ ​​चमन असे हल्लेखोर तरुणाचे नाव असून त्याच्यावर पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. पीडित तरुणीने काही महिन्यांपूर्वी आरोपीविरुद्ध छेडछाडीचा गुन्हा दाखल केला होता. त्यात तो तुरुंगातही होता. याचाच राग धरून तरुणाने तरुणीवर हल्ला केला. या प्रकरणी आता पुरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहे.

हिंगोलीमध्ये दोन गटात वाद..

हिंगोली (Hingoli) शहरात अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या रागातून दोन गटात हाणामारीची घटना घडली आहे. या घटनेनंतर दोन्ही गट आमने-सामने आल्याने प्रचंड दगडफेक झाली. काल रात्री (२९, मार्च) दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Gevrai Assembly Constituency : ना मविआ ना महाविकास आघाडी; लक्ष्मण पवारांचं ठरलं, अपक्षमधून लढणार

Post Office Scheme : फक्त व्याजातून २ लाख रुपये, पोस्ट ऑफिसची ही योजना नक्की आहे तरी काय?

Maharashtra Assembly Election : खासदार वडिलांपेक्षा मुलाची संपत्ती तिप्पट, विलास भुमरेंकडे ३३ कोटींपेक्षा जास्त संपत्ती!

Chhagan Bhujbal Net Worth: संपत्तीत ८२ लाखांची वाढ, डोक्यावर ४४ लाखांचे कर्ज; छगन भुजबळांची संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT