Crime News saam tv
क्राईम

Mumbai Crime News: अल्पवयीन बॉयफ्रेंडसाठी स्वतःच्याच घरात चोरी; दीड महिन्यांनंतर तरुणीसह मुलाच्या आईला अटक

Crime News: मुंबईमध्ये एका १९ वर्षीय तरुणीने अल्पवयीन बॉयफ्रेंडसाठी स्वतःच्याच घरातच चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुगरा शेख असे या तरुणीचे नाव आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai Crime News:

मुंबईमध्ये एका १९ वर्षीय तरुणीने अल्पवयीन बॉयफ्रेंडसाठी स्वतःच्याच घरातच चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुगरा शेख असे या तरुणीचे नाव आहे. सुगराने बॉयफ्रेंडसाठी घरातील दागिने चोरले आणि आपल्या बॉयफ्रेंडला दिले. त्यानंतर बॉयफ्रेंड आणि त्याच्या आईने हे दागिने विकले. याप्रकरणी तरुणीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणी, बॉयफ्रेंडच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Latest News)

पोलिसात तक्रार झाल्यानंतर घाबरलेल्या बॉयफ्रेंड आणि त्याच्या आई परिसरातून पळ काढला. त्यानंतर तरुणीनेदेखील भीतीपोटी मुंबईतून पळ काढला आणि बॉयफ्रेंडच्या गावी गेली. पोलिसांनी दीड महिन्यात मुलगी आणि तिच्या बॉयफ्रेंडचा शोध घेतला. ते दोघे पश्चिम बंगालमध्ये राहत होते. मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला औपचारिक नोटीस पाठवून सोडून देण्यात आले. याप्रकरणी मुलाची आई आणि गर्लफ्रेंडला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुगरा मालवणी येथे राहत होती. तिचे एका १७ वर्षीय मुलासोबत प्रेमसंबंध होते. सुगराच्या आई-वडिलांनी तिच्या लग्नासाठी तीन लाख रुपयांचे दागिने बनवले होते. मात्र, सुगराने मुलाच्या सांगण्यावरुन स्वतःच्या घरातून दागिने चोरले आणि बॉयफ्रेंडला दिले. मुलाच्या आईने हे दागिने विकले. त्यानंतर पैसे घेऊन मायलेक कोलकाता येथे गावी फरार झाले. दीड महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांनी पश्चिम बंगालमधून आरोपींना पकडले.

तरुणीच्या आई-वडिलांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरु केला. दोन दिवसांनी पोलिसांनी मुलीला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. त्यानंतर काही दिवसातच मुलगी घरातून पळून गेली. कुटुंबियांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार केली. त्यानंतर तपासाला खरी दिशा मिळाली.

पोलिसांना मुलीवर संशय आल्यानंतर मुलीचे ठिकाण शोधण्याचा प्रयत्न केला. तरुणीचे कॉल रेकॉर्ड चेक करण्यात आले. यात आरोपी दर आठ दिवसांनी फोन नंबर बदलतात, असं समजलं. तपासादरम्यान आरोपी पश्चिम बंगालमध्ये असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांचे पथक बंगालला रवाना झाले. तिथे तरुणी, तिचा बॉयफ्रेंड आणि त्याच्या आईला ताब्यात घेण्यात आले. मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला नोटीस देऊन तात्काळ सोडण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शरद पवारांचा धनंजय मुंडेंना धक्का; बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश, मुंडेंवर आरोप करत सगळंच बाहेर काढलं

Bihar Tourist: बिहारमधील टॉप १० ठिकाणे, आयुष्यात एकदा तरी नक्की भेट द्या

Maharashtra Live News Update : समृद्धी महामार्गावर आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह

Rashmika Mandanna: रश्मिका मंदान्नाने परिधान केली सुंंदर सॅटिन साडी, पाहा फोटो

Maharashtra Politics: अखेर ठरलं! मनसे- मविआची युती झालीच, नाशिकच्या राजकारणात नवं समीकरण

SCROLL FOR NEXT