Mumbai Crime News Saam Tv
क्राईम

Mumbai Crime News : मुंबई हादरली! शाळेच्या शिपायाकडून ५ वर्षीय मुलीवर अत्याचार; दोघांना बेड्या

Mumbai Crime News : मुंबईतील मालाडमधील एका नामांकित शाळेत ५ वर्षीय मुलीवर शिपायाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पालकांच्या तक्रारीनंतर शाळेचा शिपाई आणि अधिकारी यांना पोलिसांनी अटक केली असून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • मालाडमधील शाळेत ५ वर्षीय मुलीवर अत्याचार

  • पालकांच्या तक्रारीनंतर आरोपींना अटक

  • शाळेतील सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित

  • पालक व स्थानिक नागरिकांचा तीव्र संताप

संजय गडदे, मुंबई

बदलापूरमध्ये काहीदिवसांपूर्वी एका मुलीवर स्कुल व्हॅनमध्ये अत्याचार करण्यात आले. ही घटना ताजी असतानाच मुंबईतील मालाडमध्ये एका नामांकित शाळेतील शिपायाने ५ वर्षीय मुलीवर अत्याचार केले. या घटनेने पालकवर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान मुलीच्या पालकांनी संबंधित शिपायावर आणि शाळेच्या CEO विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीसह शाळेच्या मुख्य अधिकाऱ्याला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना मुंबईतील मालाडमधील नामांकित शाळेत १२ जानेवारीला घडली होती. ५ वर्षीय मुलीवर शाळेच्या शिपायाने धमकावून तिला धाक दाखवत तिच्यावर अत्याचार केले. मात्र, मुलीने पालकांना याबद्दल काहीचं सांगितले नाही. मुलीच्या वागण्यात बदल जाणवल्यानंतर पालकांना संशय आला.

या संशयावरून पालकांनी विचारपूस केली असता तिने पालकांना घडलेला प्रकार सांगितलं. मुलीच्या सांगण्यावरून तिच्या पालकांनी ६ फेब्रुवारीला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पालकांनी शाळेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला असता त्यांना धमकावण्यात आलं.

दरम्यान मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून शाळेचा शिपाई अनिल पांचाळ (वय ३०) आणि शाळेचा सीईओ अनंत यज्ञीक (वय ६५) यांच्या विरोधात पोलिसांनी बीएनएस कलम ७४, ३५१ (२) आणि पोक्सो कलम १०,१७,२१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शाळेसारख्या सुरक्षित ठिकाणी अशा प्रकारची घटना घडल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेनंतर मालाड परिसरातील पालक आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT