Mumbai Crime 
क्राईम

Mumbai Crime: हत्येच्या गुन्ह्यातील फरार आरोपीचा १४ व्या माळ्यावरून पडून मृत्यू

Mumbai Crime: हत्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीचा चोरी करताना मृत्यू झाल्याची घटना विक्रोळीत घडलीय. एका सोसायटीच्या इमारतीच्या १४ व्या मजलावर चोरी करत असताना पाय घसरुन या आरोपीचा मृत्यू झालाय.

Bharat Jadhav

मयूर राणे, साम प्रतिनिधी

हत्या आणि हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीचा १४ व्या माळ्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. चोरी करत असताना हा आरोपी १४ व्या मजल्यावरुन खाली पडला. अक्षय बाईत असे या आरोपीचे नाव असून तो विक्रोळी परिसरात राहत होता. रविवारी पहाटे अक्षय हा विक्रोळी टागोरनगर परिसरातील मधुबन सोसायटीत चोरीच्या उद्देशाने शिरला होता.

त्यावेळी चोरी करण्यासाठी तो १४ व्या माळ्यावर गेला होता. त्या माळ्यावरुन अक्षयचा पाय घसरला आणि इमारतीवरुन खाली पडला. यासंदर्भात विक्रोळी पोलिसांनी माहिती दिली. अक्षयवर हत्या, हत्येचा प्रयत्न, चोरी यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. दोन दिवसांपूर्वी अक्षय आणि त्याच्या साथीदारांनी पार्कसाईट पोलीस ठाण्यात एका तरुणाला विवस्त्र करून त्याला मारहाण करत त्याची हत्या केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हत्येनंतर त्या व्यक्तीचा मृतदेह हा कसारा येथे टाकला होता.

या गुन्ह्यात इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात अक्षय हा फरार आरोपी होता. दरम्यान आज त्याचा चोरी करताना इमारतीच्या १४ व्या माळ्यावरून पडून मृत्यू झाला. याप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT