Mumbai Police News Saam Tv
क्राईम

Mumbai News : मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी, रात्रीच्या वेळी दुकान फोडणारी टोळी गजाआड, लाखोंचा माल जप्त

Mumbai Police News : अंधेरी पोलिसांनी तब्बल १५० हून महागडी घड्याळे आणि मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला गजाआड केले असून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चार आरोपींना ठाण्यातून अटक करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • अंधेरी परिसरातील मोबाईल शॉप फोडून लाखोंची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेलचा रस्ता दाखवला आहे.

  • पोलिसांनी आरोपींकडून तब्बल १५० महागडी घड्याळे आणि मोबाईल जप्त केले.

  • चार आरोपींना ठाणे परिसरातून अटक करण्यात आली आहे.

  • पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा.

संजय गडदे, मुंबई

अंधेरी पोलिसांनी तब्बल १५० हून महागडी घड्याळे चोरी करणाऱ्या टोळीला गजाआड करून मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे. अंधेरी परिसरातील मोबाईल शॉप फोडून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या या सराईत आरोपींना अंधेरी पोलिसांनी ठाणे परिसरातून बेड्या ठोकल्या. या कारवाईत एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून विविध कंपन्यांची महागडी १५० घड्याळे, १० मोबाईल हँडसेट, कव्हर्स आणि ४४ हजार ६०० रुपयांची रोकड असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मोईनुद्दीन नजीम शेख (वय ४६) साबीर मुस्तफा शेख (वय ४०) अमरउद्दीन अलीहसन शेख आणि प्रभू चौधरी (३०) अशी अटक आरोपींची नावे असून हे सर्व आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस याप्रकरणी अधिकचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ०७/०९/२५ रोजी मध्यरात्री सुमारास अंधेरी मेट्रो स्टेशनजवळील सुमित इलेक्ट्रॉनिक्स या मोबाईल शॉपचे शटर उचकून चोरट्यांनी मोठी चोरी केली होती. या घटनेत सॅमसंग, ओप्पो, विवो, रिअलमी, डिजायर या कंपन्यांचे दहा मोबाईल फोन तसेच विविध कंपन्यांची महागडी घड्याळे आणि रोकड असा एकूण ३२ लाख ९२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. या प्रकरणी अंधेरी पोलिस ठाण्यात कलम 305,331(3) 3, (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत ठाणे, कळवा परिसरात सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतले. मोईनुद्दीन नजीम शेख (वय ४६) साबीर मुस्तफा शेख (वय ४०) अमरउद्दीन अलीहसन शेख आणि प्रभू चौधरी (३०) अशी अटक आरोपींची नावे असून हे सर्व आरोपी पूर्वीपासून गुन्हेगार असून, त्यांच्यावर चोरी व घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी तब्बल १५० मोबाईल फोन्स, १० हँडसेट कव्हर्स आणि ४४ हजार ६०० रुपयांची रोकड असा एकूण २३ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस उप आयुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अंधेरी विभाग गजानन पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश मच्छिंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

विशेष पथकात पो.नि. विनोद पाटील, पो.नि. किशोर परकाळे, पो.उपनि. रमाकांत सुपे, तसेच पोलीस हवालदार पेडणेकर, कांबळे शिंदे पुजारी कांबळी , पिसाळ व पोलीस शिपाई म्हात्रे, पाटील,लोंढे, गवळी, टर्की, तिघोटे, नरबट, मोरे यांचा समावेश होता. या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांतून आरोपींना अटक करून मोठी चोरी उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईमुळे अंधेरी परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, सराईत गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक पुन्हा प्रस्थापित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathwada Rain : मराठवाड्यात पावसाचं तांडव! २४ तासात ८ जणांचा मृत्यू, शेकडो जनावरे दगावली

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई, सरकार किती रुपये मदत देणार? कृषिमंत्र्यांनी सविस्तर सांगितलं

Diwali Horoscope 2025: दिवाळीपूर्वी सूर्याचे तूळ राशीत संक्रमण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Maharashtra Live News Update: 27, 28 आणि 29 सप्टेंबर मराठवाड्यासाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून "अलर्ट" जारी

Navratri Fasting Drinks: नवरात्रीच्या उपवासात भूक लागलीतेय? मग 'हे' सुपर एनर्जेटिक ड्रिंक्स करून बघा

SCROLL FOR NEXT